Advertisement

वेटर नसलेलं अनोखं हाॅटेल


वेटर नसलेलं अनोखं हाॅटेल
SHARES

एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुमची ऑर्डर घेण्यासाठी वेटर येतो. तुम्हाला काय हवं नको ते विचारतो. तुम्ही दिलेली ऑर्डर व्यवस्थित ऐकून त्यानुसारच तो आणून देतो. पण आम्ही तुम्हाला आज अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत जिथं एकही वेटर नाही. विना वेटर हॉटेल कसं काय  चालणार? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात डोकावला असणार. पण हीच तर या हॉटेलची खासियत आहे. 


 

मी ज्या रेस्टॉरंटबद्दल तुम्हाला सांगतेय त्याचं नाव आहे 'ब्रुशिएतो फूड फॅक्टरी' म्हणजेच बीएफएफ. बीएफएफ या शब्दाचा प्रयोग सोशल मीडियावर चांगलाच प्रचलित आहे. पण तुमच्या भेटीला वेगळाच बीएफएफ आला आहे. हा बीएफएफ खाद्यपदार्थांसोबतच तिथल्या इंटेरियरमुळेही अधिक ओळखला जातोय.



बीएफएफची खासियत

बीएफएफची खासियत म्हणजे तुमची ऑर्डर घ्यायला कुणी वेटर येणार नाही. तर तुम्हाला तुमची ऑर्डर स्वत: द्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला जागेवरून उठायची देखील गरज नाही. कन्व्हेयर बेल्टचा वापर करत तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे. कन्व्हेयर बेल्ट हा फिरता असतो. प्रत्येक टेबलावरून हा बेल्ट फिरतो. या बेल्टला टेबलाच्या नंबरनुसार पॅड लावलेले असतात. कन्व्हेयर बेल्टच्या मदतीनं त्या-त्या टेबलावर हे पॅड जातात. पॅडवर तुमची ऑर्डर लिहून द्यायची. पुन्हा पॅड कन्व्हेयर बेल्टला लावायचा. हा बेल्ट तुमची ऑर्डर किचनपर्यंत पोहोचवेल.



कुणाची संकल्पना?

हल्ली येणाऱ्या नवीन कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये टॅबच्या मदतीनं ऑर्डर घेतली जाते. तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही टॅबवर सिलेक्ट करता आणि तुमची ऑर्डर काही वेळात तुमच्यापर्यंत पोहोचते. पण बीएफएफनं मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान या साऱ्या गोष्टींची सुरेख सांगड घातलीय. सर्वांच्या पसंतीस उतरलेली ही संकल्पना अविनाश पुजारी, चिराग पटेल आणि रोनित भोगले या तिघा मित्रांना सुचली. काही तरी हटके करायचं हा विचार करूनच तिघांनी ही संकल्पना राबवून नवी मुंबईतील एेरोली येथे हे हाॅटेल सुरू केलं. 



हेही वाचा

वाईन अॅण्ड डाईन! वाईन इज शाईन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा