Advertisement

बीअर आणि चॉकलेटचा डबल धमाका


बीअर आणि चॉकलेटचा डबल धमाका
SHARES

बीअर आणि चॉकलेट हे दोन प्रकार आपल्यासाठी काही नवीन नाहीत. बीअर पिणारे क्वचितच असतील. पण चॉकलेट प्रेमी मात्र आपण सर्वच आहोत. बीअर आणि चॉकलेट हे दोन्ही प्रकार देखील अनेकांना आवडतात. मात्र तुम्ही कधी चॉकलेट आणि बीअर एकत्र करून खाल्लं आहे का? तुम्हाला हे कॉकटेल विचित्र वाटत असेल. पण 'आयरीश हाऊस'नं चॉकलेट आणि बीअर हे दोन वेगवेगळे प्रकार एकत्र करून चॉकलेट बीअर बनवली आहे.


रीवरडान्स पदार्थ 

चॉकलेट आणि बीअर हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. हे दोन्ही प्रकार आपण अनेकदा वेगळेवेगळे ट्राय केले असतील. पण आयरीश हाऊसनं पहिल्यांदाच एक हटके प्रयोग केला आहे. त्यांनी चॉकलेट आणि बीअर हे दोन्ही पदार्थ एकत्र आणत रीवरडान्स पदार्थ लाँच केला आहे


चॉकलेटला बीअरचा तडका

बीअरच्या मोठ्या ग्लासमध्ये रीवरडान्स हा प्रकार सर्व्ह केला जातो. यामध्ये ब्राऊनी, ब्राऊनी क्रंम्बल आणि व्हॅनिला आईस्क्रिम, चॉकलेट ट्रफल, चॉकलेट कोटेड कुकीज आणि टॉपला कॅरेमल सॉस आणि कॅरमलाईज नट्स असतात. सर्वात शेवटी बीअर यामध्ये अॅड केली जाते. अशा प्रकारे तुमचं चॉकलेट बीअर तयार होतं. या चॉकलेट बीअरसाठी तुम्हाला ५४५ रुपये मोजावे लागतील.

कुठे : आयरीश हाऊसच्या सर्व आऊटलेट्समध्ये उपलब्ध
अंदाजे किंमत : १८०० ( दोघांसाठी)संबंधित विषय
Advertisement