Advertisement

कोकणी पदार्थांचा अस्सल 'आस्वाद' घ्यायचाय? मग या महोत्सवात सहभागी व्हा


कोकणी पदार्थांचा अस्सल 'आस्वाद' घ्यायचाय? मग या महोत्सवात सहभागी व्हा
SHARES

कोकण म्हणजे महाराष्ट्राचं नंदनवंदनच. नयनरम्य सागरकिनारे, ऐतिहासिक सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले ही कोकणची ठळक वैशिष्ट्ये. पण यासोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रसनानंद देणाऱ्या पाककृती आणि लज्जतदार, चटकदार मेजवानी. कोकणातल्या याच मेजवानीचा आस्वाद तुम्हाला दादरमध्ये घ्यायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रीयन पदार्थांचं माहेर घर असणाऱ्या आस्वादनं कोकण खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं आहे. कोकणातील सुग्रास जेवण मनात दडून बसलेल्या खवय्यांना इथं तृप्तीचा ढेकर आल्याशिवाय राहणार नाही.


येवा आस्वाद आपलच असा

तसं पहायला गेलं तर माझ्या मते कोकणी स्वयंपाक घरात मासळीच्या तुलनेत शाकाहारी पदार्थ काहीसे दुर्लक्षित राहिले आहेत. असं असलं तरी कोकणातील शाकाहारी पदार्थ देखील खवय्यांच्या मनावर राज्य करतात. तुम्हाला देखील कोकणातल्या अस्सल शाकाहारी पदार्थांची चव चाखायची असेल तर आस्वादमध्ये या. २० ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान कोकण खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं आहे


अस्सल मेजवानी

कोकण खाद्य महोत्सवात अलटरनेट दोन प्रकारचे कॉम्बो ठेवण्यात आले आहेत. या दोन थाळ्यांमधील मेन्यू वेगवेगळा आहे. कॉम्बो १ मध्ये वडे, स्पे. काळा वटाणा आमटी, भात, टॉमेटो कढी, वांग्याचे भरीत, बटाटा भजी, धोंडस या पदार्थांचा समावेश आहे. तर कॉम्बो २ मध्ये घावणे, आल्या काजूची उजळ, भात, कुळीथ पीठी, वाटल्या डाळीची भजी, गाजराची कोशिंबीर, गुळपोहे या अस्सल कोकणी पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सर्व पाककृती शेफ अनघा रमाकांत देसाई यांच्या फ्रॉम आजीज् किचन या पाककृती पुस्तकाच्या मदतीनं बनवण्यात आल्या आहेत.    


आजीज् किचनची पाककृती

कॉम्बो १ आणि कॉम्बो २ या दोन प्रकारात त्यांनी थाळ्या सादर केल्या आहेत. कॉम्बो १ थाळीचा आस्वाद तुम्ही मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी घेऊ शकता. तर कॉम्बो २ या थाळीतील पदार्थांचा आस्वाद बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी घेऊ शकता. तुम्हाला देखील अस्सल कोकणी पदार्थांची चव चाखायची असेल तर दादर इथल्या आस्वादला नक्की भेट द्या


दिवसेंदिवस आपली खाद्य संस्कृती बदलत चालली आहे. बदलत्या खाद्य संस्कृतीमुळे आपल्या काही पारंपारीक आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचा विसर पडत चाललाय. पण आस्वादनं मराठी पदार्थ म्हणा किंवा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती टिकवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. कोकण खाद्य महोत्सव देखील आम्ही यासाठीच आयोजित केला आहे. जेणेकरून अस्सल कोकणी पदार्थांचा चव सर्वांना चाखता यावी

- सुर्यकांत सरजोशी, मालक

 


हेही वाचा

चहाला आईस्क्रीमचा तडका

खवय्यांसाठी कुल्फी वॉफल्सची ट्रिट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा