Advertisement

चहाला आईस्क्रीमचा तडका

चहा म्हणजे केवळ साखर, चहा पावडर आणि दुधाचे उकळते मिश्रण नव्हे, त्यापलीकडेही चहाचे चविष्ट प्रकार आहेत. नवनव्या चवीच्या शोधात असणाऱ्या चहाबाजांसाठी मसाला लाइब्रररीतर्फे चाय आईस्क्रीम हा भन्नाट प्रकार सादर करण्यात आला आहे.

चहाला आईस्क्रीमचा तडका
SHARES

नुसत्या नावाच्या उच्चारानेच आपल्याला तरतरीत करणारं पेयं म्हणजे चहा. भारतीयांचीच नव्हे तर जगभरातल्या अनेकांची सकाळ चहाच्या वाफळत्या पेल्याशिवाय अशक्य आहे. चहाशिवाय सकाळ म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशीच भाववस्था. या महात्म्यामुळेच पाण्याच्या खालोखाल लोकप्रिय ठरलेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पेय आहे.

चहा म्हणजे केवळ साखर, चहा पावडर आणि दुधाचे उकळते मिश्रण नव्हे, त्यापलीकडेही चहाचे चविष्ट प्रकार आहेत. नवनव्या चवीच्या शोधात असणाऱ्या चहाबाजांसाठी मसाला लाइब्रररीतर्फे चाय आईस्क्रीम हा भन्नाट प्रकार सादर करण्यात आला आहे.


चाय आईस्क्रिमची खासियत

चहाचे अनेक चविष्ट अवतार आहेत. त्यापैकीच एक अवतार म्हणजे चाय आईस्क्रीम.  चाय आणि आईस्क्रीम हे दोन अगदी विरुद्ध टोकाचे पदार्थ. एक गरमा-गरम वाफळणारा चहा आणि दुसरं थंडगार आईस्क्रीम. पण मसाला लाइब्रररीनं मात्र हे दोन्ही विरुद्ध टोकाचे पदार्थ एकत्र करण्याची किमया केली आहे. बदामाची चिक्कीसोबत चहा आईस्क्रिम सर्व्ह केले जाते. चाय आईस्क्रीम फ्लेवर हे अगदी घरगुती असून आईस्क्रीम चाय वरील फोम (फेस) हा मसाला चायपासून बनवण्यात आला आहे.


हटके पदार्थांसाठी प्रसिद्ध

चाय आईस्क्रीमसोबत आणखी काही हटके पदार्थ इथं चाखायला मिळतील. जिलेबी विथ रबडी हा प्रकार नक्की ट्राय करा. याशिवाय इंडियन भेंडी जयपुरी विथ पापड मसाला, स्पेशल रस्सम सूप याचा देखील आस्वाद घ्या.


कुठे : मसाला लायब्रररी, तळ मजला, फर्स्ट इंटरनॅशनल फायनांस सेंटर, जी ब्लॉक, वांद्रे (पू.), सॉफिटेल हॉटेलच्या समोर, मुंबई – 400050



हेही वाचा

पुण्याचा तंदूर चहा अाता डोंबिवलीत

तुम्ही 'चीझ टी' ट्राय केलीत का?



    

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा