Advertisement

हिंमत असेल तर ही थाळी एकट्यानं संपवून दाखवाच

क्वार्टर कॅनटीनची खासियत म्हणजे जेवणाची एक भली-मोठी थाळी. एवढी मोठी थाळी की तुम्हाला एकट्याला ही थाळी संपवणं म्हणजे फार कठीणच. या थाळीचं नाव जेवढं भारदस्त आहे त्याप्रमाणे इथला मेन्यूही भारदस्त आहे. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन पर्याय इथं उपलब्ध आहेत.

हिंमत असेल तर ही थाळी एकट्यानं संपवून दाखवाच
SHARES

जेव्हा जेव्हा आपण बाहेर जेवतो तेव्हा आपल्याला नवीन ठिकाणं हवी असतात. मात्र प्रत्येक वेळी आपल्याला नवीन ठिकाणं भेटतातच असं नाही. खवय्यांसाठी तर नवीन ठिकाणं शोधणं ही एक पर्वणीच असते. नवीन चांगल्या प्रतीचं जेवण किंवा एखादा पदार्थ मिळणारं ठिकाण शोधण्यासाठी खवय्ये काय करतील काही सांगता येत नाही. मग आम्ही देखील तुमच्यासाठी एक भन्नाट ठिकाण शोधलं आहे ते म्हणजे वांद्रे इथलं 'क्वार्टर कॅनटीन' हे रेस्टॉरंट.


महाराजा थाळीची दावत

क्वार्टर कॅनटीनची खासियत म्हणजे जेवणाची एक भली-मोठी थाळी. एवढी मोठी थाळी की तुम्हाला एकट्याला ही थाळी संपवणं म्हणजे फार कठीणच. पूर्वीच्या काळी एखाद्या राजा, महाराजांच्या थाळ्या कशा भरलेल्या असत. सर्व पंचपक्वानं त्या ताटात असायची. तसंच काहीसं या 'महाराजा थाळी'मध्ये तुम्हाला पहायला मिळेल.


थाळीची खासियत

या थाळीचं नाव जेवढं भारदस्त आहे त्याप्रमाणे इथला मेन्यूही भारदस्त आहे. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन पर्याय इथं उपलब्ध आहेत. नॉन व्हेज थाळीमध्ये बटर चिकन, मटण रारा, डाल मखनी, चिकन बिर्यानी, फिश फ्राय, मुर्ग लसूनी, लखनवी बोटी हे पदार्थ आहेत. तर व्हेज थाळीमध्ये पनीर बटर मसाला, मेथी बटर मलाई, तंदुरी आलू, पनीर मलाई सीख, पनीर मलाई टिक्का हे पदार्थ तुम्ही पोट भरून खाऊ शकता. यानंतर गोड पदार्थ देखील आहेच. एका थाळीत जवळपास 16 पदार्थ आहेत.  


किंमत किती?

एका थाळीत अख्खं कुटुंब जेवू शकतं. थाळीमध्ये भक्कड मेन्यू असेल तर त्याच्या किंमती देखील तशाच आहेत राव. व्हेज थाळीसाठी १ हजार ९९९ रुपये तर नॉनव्हेज थाळीसाठी २ हजार ४९९ रुपये मोजावे लागतील.

 कुठे : क्वार्टर कॅनटिन, तळ मजला, 35th स्ट्रिट, लिंकिंग रोड, वांद्रे, मुंबई 400050

वेळ : दुपारी १२ ते ३.३० आणि रात्री ७ ते १.३० पर्यंत


हेही वाचा

कोकणी पदार्थांचा अस्सल 'आस्वाद' घ्यायचाय? मग या महोत्सवात सहभागी व्हा

चहाला आईस्क्रीमचा तडका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा