Advertisement

साऊथ इंडियन फेस्टिव्हलचा तडका

मुंबईकरांच्या सुपरफास्ट जीवनात इडली, वडा, डोसा या पदार्थांनी अढळपद प्राप्त केलेलं आहे. पण इडली, वडा आणि ढोसा या व्यतिरिक्त आपल्याला साऊथ इंडियन पदार्थांविषयी क्वचितच माहिती असावं. पण या फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थांची ओळख तर होईलच. याशिवाय तुम्ही या पदार्थांचा आस्वाददेखील घेऊ शकाल.

साऊथ इंडियन फेस्टिव्हलचा तडका
SHARES

मुंबईकर आणि मुंबई बाहेरून आलेल्या अनेकांच्या दृष्टीनं मुंबईचा स्पेशल पदार्थ म्हणजे वडापाव. पण मुंबईतल्या सहार इथल्या जे. डब्ल्यू. मॅरियटमध्ये येत्या काळात फेरफटका माराल तर तुम्हाला दक्षिण भारतच अनुभवायला मिळेल. कारण जे डब्ल्यू मॅरियटमध्ये २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत 'सदन सोजन' फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे.



साऊथ इंडियन तडका

मुंबईकरांच्या सुपरफास्ट जीवनात इडली, वडा, डोसा या पदार्थांनी अढळपद प्राप्त केलेलं आहे. पण इडली, वडा आणि ढोसा या व्यतिरिक्त आपल्याला साऊथ इंडियन पदार्थांविषयी क्वचितच माहिती असावं. पण या फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थांची ओळख तर होईलच. याशिवाय तुम्ही या पदार्थांचा आस्वाददेखील घेऊ शकाल. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील प्रसिद्ध पदार्थ तुम्हाला चाखता येतील.




हटके पदार्थांची मेजवानी

फेस्टिव्हलमध्ये एक नाही तर चार शेफ इथं त्यांच्या सिगनेचर डिश सादर करणार आहेत. पुण्याच्या जे. डब्ल्यू.मॅरियटचे शेफ स्वामी कर्नाटका क्युझिन फुड सादर करणार आहेत. तर चेन्नईच्या कंट्रीयार्डमधले शेफ चंद्र कांत तराई हे तमिळनाडू इथल्या स्पेशल डिशेस सादर करणार आहेत. कोचीच्या मॅरियेट हॉटेल आणि सुट्समधले शेफ शीरीन जुडे हे केर्लन कुजिन आणि मुंबईतल्या जे.डब्ल्यू. मॅरियेटचे शेफ शिवा तंगडु हे आंध्र प्रदेश इथले पदार्थ सादर करतील.



कुठे : जे. डब्ल्यू. मॅरियट मुंबई सहार, आय. ए. प्रोजेक्ट रोड, छत्रपती शिवाजी आंतराराष्ट्रीय विमानतळ, मुंबई सहार, चकाला, मुंबई

कधी सप्टेंबर २८, २०१८ ते ऑक्टोबर ६, २०१८

वेळ संध्याकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत

किंमत २,३५० (एकासाठी)

संपर्क  - ९१२२२८५३८६५६, ९१९८९९०४४६५२


हेही वाचा -

शिव थीमवर आधारित ठाण्यातील हटके रेस्टॉरंट

टोकियो टू मुंबई : इथं घ्या जापनीज स्ट्रीट फुडचा आस्वाद




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा