Advertisement

आइस्क्रिमला अल्कॉहॉलिक ट्विस्ट!

आइस्क्रिमला एक छोटासा ट्विस्ट दिला तर? ट्विस्ट म्हणजे आइस्क्रिम आणि अल्कोहॉल एकत्र केलं तर? याच भन्नाट कल्पनेला 'ओ सो स्टोन्ड' या आइस्क्रिम पार्लरनं प्रत्यक्षात उतरवलं आहे.

आइस्क्रिमला अल्कॉहॉलिक ट्विस्ट!
SHARES

आइस्क्रिम हा प्रकार लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. या आइस्क्रिमला एक छोटासा ट्विस्ट दिला तर? ट्विस्ट म्हणजे आइस्क्रिम आणि अल्कोहॉल एकत्र केलं तर? याच भन्नाट कल्पनेला 'ओ सो स्टोन्ड' या आइस्क्रिम पार्लरनं प्रत्यक्षात उतरवलं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. तुम्हाला आइस्क्रिमचे तेच टिपिकल फ्लेवर्स घाऊन कंटाळा आला असेल, तर हा नवा पर्याय ट्राय करायला काही हरकत नाही.
 


'व्हिस्की कॅरेमल आइस्क्रिम' हा इथला प्रकार खवय्यांच्या अधिक पसंतीस उतरतोय. व्हिस्की सॉस, हॉट फज सॉस, कॅरेमल सर्व्हड विथ क्रश सॉफ्ट मॅशमेलू बिस्कीट्स यापासून व्हिस्की कॅरेमल आइस्क्रिम बनवण्यात येतं. 'रम बाबा' हा देखील आइस्क्रिमचा एक प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. 


फक्त आइस्क्रिमच नाही तर तुम्ही मिल्कशेक, ब्राऊनी, थिक शेक, वॉफल्स याचा देखील आस्अवाद घेऊ शकता. तुम्हाला चॉकलेट खायला खूप आवडत असेल तर तुम्ही 'चार्ली अॅण्ड द चॉकलेट फॅक्टरी विथ चॉकलेट फज' हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. वॉफल्स बाऊलमध्ये चॉकलेट चिप्स, नट्स आणि चॉकलेट सॉस टाकून सर्व्ह करण्यात येतं. 


इथला 'ब्राऊनी ब्लास्ट' तर अप्रतिम आहे. चॉकलेट ब्राऊनी, रीच चॉकलेट, व्हॅनिला आईस्क्रिमनं भरलेल्या बाऊलमध्ये चॉकलेट चिप्स टाकून हे सजवण्यात येते. 


याशिवाय संडेज कॉम्बोजचा देखील आस्वाद तुम्ही घेऊ शकता. पानशान हा फ्लेवर तुम्ही इथं नक्की ट्राय करा. कुल्फी आईस्क्रिम हे तुम्हाला गोड पानासोबत सर्व्ह केले जातं. किसलेलं खोबरं, फ्रूट आईस्क्रिम फज याचा वापर करून पान शान सजवण्यात येतं.


आइस्क्रिम आणि अॅल्कोहॉल या दोन्हीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ओ सो स्टोन्ड हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. मग कधी जाताय? या हटके आईस्क्रिमचा आस्वाद घ्यायला.

कुठे : आर. सिटी मॉल, एलबिसी मार्ग, अमृत नगर, घाटकोपर (प.), मुंबई



हेही वाचा-

या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा