Advertisement

बीअरचे शौकिन आहात? इथे आहेत ४० प्रकारच्या बीअर!

पिझ्झा फेस्टिव्हल, वाईन फेस्टिव्हल असे अनेक फेस्टिव्हल मुंबईत साजरे केले जातात. असाच एक फेस्टिव्हल मुंबईत होणार आहे आणि तो म्हणजे 'क्राफ्ट बीअर फेस्टिव्हल'. बीअरचे शौकिन असणाऱ्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे!

बीअरचे शौकिन आहात? इथे आहेत ४० प्रकारच्या बीअर!
SHARES

न्न ही माणसाची मूलभूत गरज. पण या गरजेचं रुपांतर आपण संस्कृतीमध्ये केलं आणि त्यातूनच जगभरात विविध खाद्यसंस्कृती निर्माण झाल्या आहेत. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध खाद्यमहोत्सवांमधून खाद्यसंस्कृतींचं प्रतिबिंब दिसून येतं. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर तर पाश्चिमात्य जगातील अनेक चालीरीती, सण आणि उत्सव भारतात साजरे व्हायला लागले.

पिझ्झा फेस्टिव्हल, वाईन फेस्टिव्हल असे अनेक फेस्टिव्हल मुंबईत साजरे केले जातात. असाच एक फेस्टिव्हल मुंबईत होणार आहे आणि तो म्हणजे 'क्राफ्ट बीअर फेस्टिव्हल'. बीअरचे शौकिन असणाऱ्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे!


बीअर फेस्टिव्हलची खासियत

मुंबईत चौथ्यांदा क्राफ्ट बीअर फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. टॅप्ड असं या फेस्टिव्हलचं नाव आहे. तुम्हाला या फेस्टिव्हलमध्ये ४० प्रकारच्या बीअरची चव चाखता येणार आहे. यासोबतच फुड आणि म्युझिक बीअर फेस्टिव्हलची मजा द्विगुणित करणार आहे. कुठल्या बीअरसोबत काय खायला द्यावं? कुठल्या पदार्थांचा स्वाद बीअरसोबत वाढेल? याला फार महत्त्व आहे. त्यामुळे बीअर फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला तसेच फुड स्टॉल्स उभारलेले दिसतील. द ब्ल्यू, वन टेबल स्पून पिझ्झा, पॅक अ पाव, द बोहरी किचन, हॉपम, देथ बाय बीबीक्यू, स्ट्रीट मीट यांसारख्या रेस्टॉरंट्सचे फुड स्टॉल इथे असणार आहेत.



हेही वाचा - वाईनचे ३०० प्रकार आणि सोबत क्रॅब पकोडा!



क्राफ्ट बीअर म्हणजे काय?

आपल्याकडे बीअरची ओळख एका ब्रँडपुरतीच राहिली आहे. पण क्राफ्ट बीअर हा परदेशात नावाजलेला प्रकार आता मुंबईत देखील प्रचलित होऊ लागला आहे. क्राफ्ट बीअर म्हणजे जिथे कमी प्रमाणात पण दर्जेदार, चविष्ट आणि विशिष्ट पद्धतीची बीअर तयार करण्यात येते. बीअर तयार करणं ही एक कला आहे. मुंबईत क्राफ्ट बीअर ही ब्रुबोट, इंडिपेंडन्स ब्रुविंग कंपनी, किमया ब्रुविंग कंपनी यांसारख्या मोठ्या कंपनी बीअर बनवतात.



बीअर बनवण्याची प्रक्रिया सुरू होते ती आंबवलेल्या माल्टपासून. माल्ट म्हणजे मादक पेय तयार करण्यासाठी सातूचे भिजवून वाळवलेले सत्व. गहू, मका आणि तांदूळ यापासून माल्ट तयार होते. प्रथम माल्ट दळून घेऊन गरम पाण्यात लापशीसारखं शिजवलं जातं. त्यातील साखर आणि मिनरल्सचा अर्क काढून घेण्यासाठी हे मिश्रण थोडा वेळ तसंच ठेवतात. वरच्या द्रावणाला वोर्त म्हणतात. हॉप्स मिसळून थोडा वेळ वोर्त उकळवून घेतली जाते. हॉप्स हा एक फुलाचा प्रकार आहे. बीअरला कडवट स्वाद यामुळेच येतो. मग यिस्ट घालून आंबवल्यानंतर बीअर तयार होते.


बीअरचे फायदे

  • संतुलित मात्रेत बीअरचे सेवन केल्याने हृदय रोग होण्याची शक्यता ४०-४५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
  • बीअरच्या सेवनमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
  • बीअरमध्ये असणारे हेट्रोसाइकिलिक अमीन्स तत्व कर्करोगाला कारणीभूत ठरणारे जिवाणू नष्ट करते.
  • संतुलित मात्रेत बीअरचे सेवन केल्याने किडनी स्टोन समस्येत आरामा मिळतो.
  • बीअरमध्ये पाणी अधिक असते. त्यामुळे ते किडनीसाठी फायदेशीर आहे.
  • बीअरमध्ये फायबर असल्याने पचनशक्ती सुधारते.
  • बीअरमध्ये लॅक्टोफ्लेविन आणि निकोटिनिक अॅसिड असल्याने ते अनिद्रेच्या समस्येवर फायदेशीर आहे.
  • एखाद दुसरी बीअर प्यायल्याने थकवा कमी होतो.
  • बीअरमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे ब्रिटिश मेडिकल जनरल १९९९च्या अभ्यासातून समोर आले आहे.



कुठे - महालक्ष्मी रेस कोर्स, डॉ. इ मोजेस मार्गरॉयल वेर्स्टन इंडिया टर्फ क्लबमहालक्ष्मीनगरमुंबई ४०००३४

कधी - रविवार, १८ मार्च २०१८

वेळ - दुपारी १२ ते रात्री १२

जनरल एंट्री -४९९(एकासाठी

जनरल एंट्री पास +१ लिटर बिअर - १००० (एकासाठी)



हेही वाचा

चहाप्रेमींसाठी स्टारबक्समध्ये मिळणार २१ प्रकारच्या चहा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा