Advertisement

खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिव्हलची मेजवानी


खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिव्हलची मेजवानी
SHARES

प्रत्येक राज्याची स्वत:ची एक विशेश अशी खाद्यसंस्कृती असते. त्यातील काही खाद्यप्रकार आता देशभर लोकप्रिय झाले आहेत. त्यापैकीच एक प्रमुख पदार्थ म्हणजे बिर्याणी. मूळ पर्शियातून मुघलांनी आणलेला हा पदार्थ बघता बघता  सर्वांच्याच पसंतीस उतरला. नवी दिल्ली, लफनऊ, हैदराबाद ही ठिकाणं तशी बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहेत. बदलत्या खाद्यसंस्कृतीचे वरदान म्हणा की या वेगवेगळ्या ठिकाणाच्या बिर्याणींचा आस्वाद आता एकाच छताखाली घेता येणार आहे. जोगेश्वरीत दोन दिवशीय 'बिर्याणी फेस्टिव्हल' आयोजित करण्यात आला आहे.


बिर्याणी महोत्सवाचे आयोजन

तुम्हाला बिर्याणीची जास्तीत जास्त किती प्रकार माहित आहेतचिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, अंडा बिर्याणी, कोळंबी बिर्याणी हे प्रकार सर्वांनाच माहित असतील. पण तुम्ही विचार केला नसेल इतके प्रकार तुम्हाला या बिर्याणी फेस्टिव्हलला खाता येणार आहे. झिंगा बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी, काश्मिरी बिर्याणी अशा वेगवेगळ्या बिर्याणी आस्वाद तुम्हाला चाखायची संधी या फेस्टिव्हलला मिळणार आहे

फक्त नॉनव्हेजच नाही तर शाकाहारी बिर्याणीचे स्टॉल्स देखील खवय्यांसाठी मेजवानी ठरणार आहेत. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ठाणे, मुंबईतल्या अनेक भागांमध्ये बिर्याणी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. पण पश्चिम उपनगरात पहिल्यांदाच बिर्याणी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.  



कुठे

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड इथल्या विजय साळस्कर उद्यानात सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत बिर्याणी फेस्टिव्हल भरणार आहे. ७ आणि ८ एप्रिल असे दोन दिवस या फेस्टिव्हलचा आनंद तुम्ही लुटू शकता.शनिवार आणि रविवारी या फेस्टिव्हलचे आयोजन केल्यानं नक्कीच खवय्यांची झुंबड उडेल.सो तुम्हीही बिर्याणी शौकिन असाल तर खवय्यांनी नक्कीच या फेस्टिव्हलला भेट द्या.


खवय्ये असाल तर एका बैठकीत ही थाळी संपवून दाखवा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा