Advertisement

मॅड फॉर डोनट्स


मॅड फॉर डोनट्स
SHARES

पाश्चात्य खाद्यसंस्कृतीकडून इथल्या रेस्टॉरंट, वाढदिवस, पार्ट्या आणि स्वयपाकघरात विराजमान झालेला केक भारतात रुळला. त्याला आता जमाना झाला. केकच्या बरोबरीनच भारतात प्रवेश केलेल्या डोनटनं देखील खवय्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

डोनट म्हणजे रिंगचा आकाराचा तळलेला किंवा ओव्हनमध्ये भाजलेला गोड प्रकार. पण डोनट्सची ओळख याही पलिकडची आहे. याची खरी ओळख खवय्यांपर्यत पोहोचवण्यामागे 'मॅड ओव्हर डोनट्स'चा देखिल तितकाच हात आहे.

इथे बेसिक क्लासिक प्रकारासह डोनट्स अनेक व्हेरियंटंध्ये उपलब्ध आहेत. डोनटवर कधी साखर तर कधी जॅम, जॅलीक्रिम यांचे टॉपिंग केलेले असते. डोनटचा एक बाईट घेताच लाव्हासारखे बाहेर येणारे डार्कचॉकलेट म्हणजे 'डबल ट्रबल', व्हाईट क्रिम आणि चेरीचे टॉपिंग्स असलेला 'ब्लॅक फॉरेस्ट ब्युटी', ब्लॅकबेरीच्या टॉपिंगनं सजलेला 'कूल ब्ल्यू आईस' असे एक ना अनेक प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. खवय्यांना काही तरी वेगळं देण्याचा एमओडीचा प्रयत्न असतो.


एमओडीची भन्नाट ऑफर

१४ जून हा आंतरराष्ट्रीय डोनट्स डे म्हणून साजरा केला जातो. मॅड ओव्हर डोनट्सतर्फे भारतात सर्वत्र १४ जूनला #donutday साजरा केला जात आहे. या दिवशी ८३ रुपयांचे डोनट्स अर्ध्या किंमतीत म्हणजे ४० रुपयाला मिळणार आहे. यासाठी मॅड ओव्हर डोनट्सने विशेष कस्टमाइझ बाॅक्स तयार केले आहेत. खवख्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मॅड ओव्हर डोनट्सने मँगो मोजो, मँगो मंत्रायलो जेलो आणि मँगो पल्प फिक्शन अशी रेंजही बाजारात आणली आहे.


डोनट्सचा रंजक इतिहास

सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या या डोनट्सचा इतिहास देखील रंजक आहे.हा इतिहास जाणून घ्यायला नक्कीच तुम्हाला आवडेल

१८४७ साली इंग्लंडमध्ये हा डोनट्स उदयाला अाला असं बोललं जातंएलिजाबेथ ग्रॅगरीनं या महिलेनं जहाजावर कॅप्टन असणाऱ्या मुलाला काही डोनट्स प्रवासात खायला दिलेत्याला ते खूप आवडले. नट्स हे बाजूला लावण्यापेक्षा तिनं ते नट्स मध्यभागी लावलेत्यामुळे डोनट्सला एका रिंगसारखा आकार आला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे डोनट्स जास्त काळ टिकावेत असे बनवण्यात आले होते


'डोनट्स डॉलीज'

१९१७ साली अमेरिका पहिल्या महायुद्धात सहभागी झाली. त्यावेळी सॅल्वेशन आर्मीतर्फे पाच-सहा जण माहिती गोळा करण्यासाठी फ्रांसला पाठवण्यात आले होते.सेल्वेशन आर्मीला जाणावलं की सैनिकांसाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे.त्यानुसार त्यांनी अमेरिकन सैनिकांसाठी काही कॅन्टिन्सचा उपक्रम सुरू करावा, असे अहवालात नमूद केले.ज्यामध्ये बेकरीचे पदार्थ, कॉफी असे खाण्याचे पदार्थ पुरवण्यात यावेत

अहवालात नमूद केलेल्या सुचनेनुसार कॅन्टिन्सचा उपक्रम सुरू करण्यात आला. अशा कॅन्टिन्सला हट्स हे नाव दिले गेले. यामध्ये प्रत्येकी ६ स्वयंसेवकांपैकी ४ महिला होत्या. अशा हट्स अमेरिकेत आर्मीच्या ट्रेनिंग सेंटर्सजवळ उभारल्या गेल्या. हट्स युद्धभूमीजवळील ओसाड इमारतींतून चालवल्या जात. त्यामुळे या हट्समधून ताज्या पदार्थांचे उत्पादन करणे कठिण जाऊ लागलेयावर उपाय म्हणून सेल्वेशन आर्मीच्या दोन स्वयंसेविका मार्गारेट शेलडॉन आणि हेलेन पुरविअन्स यांनी अधिक सुटसुटित पर्याय म्हणून डोनट्स पुरवायचे ठरवलेही कल्पना लगेच लोकप्रिय झाली. या स्वयंसेविका सैनिकांमध्ये डोनट्स डॉलीज नावानं प्रसिद्ध झाल्या


डोनट्सची पहिली बेकरी

१९५० साली विल्यम रोसेनबर्ग यांनी क्वीन्सी मॅसेच्युसेटस डंकिन डोनट्स ही बेकरी सुरू केली. या बेकरीचे रूपांतर फ्रचायझी तत्वावर चालणाऱ्या कंपनीमध्ये झाले. तेव्हापासून ११ हजार रेस्टॉरंट्स ३३ वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू झाले आहेतहेही वाचा

वेटर नसलेलं अनोखं हाॅटेल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा