नूडल्स शेक ट्राय केलंत का?

चायनीज पदार्थांमध्ये सर्रास नूडल्सचा वापर केला जातो हे आपल्या सर्वांनाच चांगलं ठाऊक आहे. याशिवाय नूडल्सचा वापर कुठल्या दुसऱ्या पदार्थामध्ये ट्राय केल्याचं मी तरी कधी ऐकलं नाही. पण घाटकोपरमध्ये नूडल्स शेक सध्या खवय्यांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे.

  • नूडल्स शेक ट्राय केलंत का?
  • नूडल्स शेक ट्राय केलंत का?
SHARE

हक्का नूडल्स, सेजवान नूडल्स, मंचूरीयन नूडल्स असे नूडल्सचे अनेक प्रकार तुम्ही खाल्ले असतील. पण तुम्ही कधी नूडल्स शेक ट्राय केला आहे का? चायनीज पदार्थांमध्ये सर्रास नूडल्सचा वापर केला जातो हे आपल्या सर्वांनाच चांगलं ठाऊक आहे. याशिवाय नूडल्सचा वापर कुठल्या दुसऱ्या पदार्थामध्ये ट्राय केल्याचं मी तरी कधी ऐकलं नाही. पण घाटकोपरमध्ये नूडल्स शेक सध्या खवय्यांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे.


नूडल्स शेकची खासियत

नूडल्स शेक म्हटल्यावर तुम्हाला आता वाटलं असेल की स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटला काही तरी वेगळा पर्याय मिळाला. हे जरी खरं असलं तरी स्ट्रॉबेरी, चॉकलेट मिल्कशेक आणि नूडल्स शेकमध्ये जमीन आसमानचा फरक आहे.

सौजन्य - मुंबई फुड जंकी (mumbai food junkie)

शेक म्हटलं की आपल्यासमोर दूधाचा वापर करून बनवलेले शेक्स समोर येतात. पण यासाठी दुधाचा अजिबात वापर केला जात नाही. यामध्ये नूडल्सचा एक थर त्यावर वेगवेगळ्या भाज्या, फ्रेंच फ्राईजस सॉसेस आणि चीझ... आहाहाहा... नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. अगदी दोन जणांचं पोट भरेल एवढा भरगच्च ग्लास असतो. यासाठी तुम्हाला फक्त ४५० रुपये मोजावे लागतील.


डोसासाठीही स्पेशल

फक्त नूडल्स शेकच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या डोसांचा आस्वाद तुम्हाला इथं घेता येणार आहे. जवळपास १०० प्रकारचे डोसे इथं सर्व्ह केले जातात. मॅगी डोसा, चीझ बर्स्ट मॅगी डोसा, चीझ बर्स्ट डोसा, चॉकलेट डोसा, आईस्क्रिम डोसा असे बरेच प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. खवय्यांसाठी तर हे कुठल्या स्वर्गाहून कमी नाही.


तुम्ही देखील अस्सल खवय्ये असाल किंवा काही तरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की इथं भेट द्या.

कुठे - पिऑर मिल्क सेंटर (pure milk centre), 19/2०, विक्रांत, आर. बी. मेहता मार्ग, टिळक रोड, घाटकोपर (पू.)हेही वाचा -

तंदुर चायनंतर आता तंदुर मॅगीची क्रेझ

एव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉरचे चाहते आहात? मग मार्व्हल्सच्या या कॅफेला भेट द्या
संबंधित विषय
ताज्या बातम्या