Advertisement

रोजच्या आहारात राजगिरा 'असा' ठरू शकतो फायदेशीर

शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्त्रोत आहे. व्हिटामीन सी चं प्रमाण अधिक असल्यानं त्वचा, केस यासाठी राजगिरा उपयुक्त आहे. याशिवाय हिरड्याच्या विकारात फायदेशीर आहे.

रोजच्या आहारात राजगिरा 'असा' ठरू शकतो फायदेशीर
SHARES

राजगिऱ्याची चिक्की अनेकदा आपण उपवासाला खातो. पण राजगिऱ्याचा फक्त उपवासातच नाही तर रोजच्या आहारातहीा समावेश असावा. कारण राजगिरा हा अत्यंत गुणकारी आहे. नेमके राजगिरा खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.


राजगिऱ्यातील गुणधर्म

शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्त्रोत आहेयाशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरसपोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. राजगिऱ्याच्या लाह्या तर पचायला आणखी हलक्या आहेत. लाडूधिरडीथालिपीठंडोसेउपमा अशा पदार्थात जमेल तिथे थोड्या प्रमाणात राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकेल.



राजगिऱ्यामधील पोषणतत्व


कॅलरी ३७१ मिली ग्रॅम
कार्ब्स ३७१ मिली ग्रॅम
प्रोटीन १३.५ मिली ग्रॅम
आर्यन ७६ मिली ग्रॅम
शुगर १.६९ मिली ग्रॅम
फॅट .२ मिली ग्रॅम
मॅग्नेशियम २४८ मिली ग्रॅम
फायबर .७ मिली ग्रॅम
कॅल्शियम १५९ मिली ग्रॅम
स्टार्च ५७ मिली ग्रॅम



राजगिरा खाण्याचे फायदे

१) राजगिऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असतं.  त्यामुळे हाडं मजबूत होतात.

२) व्हिटामीन सी चं प्रमाण अधिक असल्यानं त्वचा, केस यासाठी राजगिरा उपयुक्त आहे. याशिवाय हिरड्याच्या विकारात फायदेशीर आहे

३) राजगिरा ग्युटन फ्री आहे. त्यामध्ये फायबर्स असल्यानं वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे.

४) राजगिऱ्यातील प्रोटीनमध्ये इन्सुलिनवर नियंत्रण राखण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे डायबेटिज असलेलेदेखील राजगिऱ्याचं सेवन करू शकतात.



५) तुम्हाला मायग्रिनचा त्रास असेल तर राजगिरा फायदेशीर आहे. कारण राजगिरामध्ये मॅग्नेशियम असते

६) राजगिऱ्याच्या सेवनानं पचनक्रिया सुधारते.

७) मातृत्वामध्ये स्तनदुग्धाची वृद्धी राजगिऱ्याच्या नियमित सेवनानं होते.

८) नेत्ररोगामध्येदेखील राजगिरा फायदेशीर आहे. राजगिऱ्याच्या सेवनानं दृष्टी उत्तम राहते.



राजगिऱ्याचे सेवन यांनी करू नये

रोजच्या आहारात राजगिऱ्याचे सेवन फायद्याचं आहे. पण काही जणांसाठी हा नियम लागू होत नाही.  

  • किडनी स्टोन : तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर राजगिराचं सेवन करू नये. कारण यामध्ये ऑक्सलेट नावाचे रसायन आहे ज्यामुळे किडनी स्टोन वाढू शकतो
  • अॅलर्जी :  अॅलर्जीचा त्रास असेल अशांनी राजगिरा खाण्याआधी विचार करावा.  

सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजगिरा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी याचा अर्थ असा होत नाही की तो कितीही आणि कसाही खावा. रोज जर योग्य प्रमाणात राजगिराचं सेवन केलं तर त्याचे फायदे अनेक आहेत.  



हेही वाचा

शेंगदाणे खाण्याचे 'हे' आहेत फायदे

आता घरच्या घरी उगवा भाज्या




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा