Advertisement

आता घरच्या घरी उगवा भाज्या

किचन गार्डनसाठी प्रशस्त जागेची अजिबात गरज नाही. अगदी किचनच्या खिडकीत, ग्रिलमध्ये मिरची, लिंबू, गवती चहा, मेथी, अळू, छोटे चेरी, टोमेटो, कोथिंबीर, कारले, कडीपत्ताही तुम्ही लावू शकता. या झाडांना फार देखभालीची देखील गरज नसते.

आता घरच्या घरी उगवा भाज्या
SHARES

घरातील इतर गार्डनिंगपेक्षा वेगळा असा किचन गार्डन हा प्रकार. शब्दश: म्हणायचं तर स्वयंपाकघरातील बगीचा. या किचन गार्डनमध्ये उपयुक्त अशा भाज्या घरच्या घरी पिकवता येऊ शकतात. त्या भाज्या पिकवाव्यात आणि आपल्या रोजच्या जेवणात वापराव्यात. म्हणजे किचन गार्डनचा उद्देश एकच... हवं ते पिकवा, ताजं आणि मजेत खा.


कमी जागेत सुंदर गार्डन    

किचन गार्डनसाठी प्रशस्त जागेची अजिबात गरज नाही.  अगदी किचनच्या खिडकीत, ग्रिलमध्ये मिरची, लिंबू, गवती चहा, मेथी, अळू, छोटे चेरी, टोमेटो, कोथिंबीर, कारले, कडीपत्ताही तुम्ही लावू शकता. या झाडांना फार देखभालीची देखील गरज नसते. दिवसभरात एकदा पाणी आणि २-३ तास ऊन मिळाल्यास फारच कमी वेळेत या भाज्या पिकवता येतात. तुमच्या घराच्या बाजूला आकर्षक फळ आणि भाज्यांनी सजलेल्या हिरव्यागार गार्डनमुळे घरालाही एक वेगळंच सौंदर्य लाभतं.


गार्डन कसं करायचं?

तुम्हाला सुद्धा घरात किंवा बागेत एखादं छानसं किचन गार्डन निर्माण करायचं आहे. पण नेमकं कसं करायचं? आणि त्यासाठी काय करावं लागेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग तुमच्यासाठी आहे ना IKheti (खेती). खेती हा ग्रुप तुम्हाला घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये कशा प्रकारे गार्डन तयार करायचं यासाठी मार्गदर्शन करेल


निसर्ग प्रेमींना खेतीचा पाठिंबा

निसर्गप्रेमी प्रियंका अमर शहा यांनी खेती या कंपनीची सुरुवात केली. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला खेती ही कंपनी पाठिंबा देते. जागेच्या कमतरतेमुळे अनेक जण घरातच छोटीशी बाग बनवण्याच्या विचारात असतात. पण गार्डनिंगची नीट माहिती नसल्यानं बाग बनवण्याचा विचार प्रत्यक्षात साकारला जात नाही. मग अशा वेळी तुमच्या मदतीला खेती ग्रुप धावून येतो. यासाठी फक्त तुम्हाला १५०० रुपये मोजावे लागतील. या १५०० रुपयात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू शकतात. याशिवाय ते बिया आणि गार्डनिंग किट्स याची देखील विक्री करतात. त्यांच्याकडे रोपट्यांची देखील विक्री केली जाते.

सो, तुम्हालासुद्धा तुमच्या घरी, बाल्कनी किंवा गच्चीवर सुंदरशी बाग बनवायची असेल तर खेतीने दिलेल्या सल्ल्यानंतर तुम्हाला किचन गार्डन तयार करणं सोपं जाईल

Ikheti (खेती)

मेल आयडी : info.ikheti@gmail.com



हेही वाचा

घरातील आधुनिक बाग!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा