Advertisement

शेंगदाणे खाण्याचे 'हे' आहेत फायदे

शेंगदाणे हा एक उत्तम प्रोटीन आणि खनिजयुक्त पदार्थ आहे. एक लीटर दुधातून जेवढे प्रोटीन भेटतात तेवढे प्रोटीन १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यानं मिळतात. मुठभर शेंगदाण्यामध्ये ४२६ कॅलरीज, ५ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि १७ ग्रॅम प्रोटीन असतात.

शेंगदाणे खाण्याचे 'हे' आहेत फायदे
SHARES

अनेकदा भूक लागली की आपण बाहेरचं काही तरी अनहेल्दी खातो. तुमच्या या भुकेला पर्याय म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे हे जास्त महाग नसतात. म्हणून शेंगदाणे हे गरीबांचे बदाम असतात. बदामात मिळणारी सर्व पोषण द्रव्य शेंगदाण्यात आहेत. तुम्हाला एखाद्या भेळवाल्याकडे दखील शेंगदाणे सहज मिळतील. याचे फायदे वाचून तुम्ही भूक लागली की शेंगदाण्यालाच प्राधान्य द्याल



शेंगदाणे हा एक उत्तम प्रोटीन आणि खनिजयुक्त पदार्थ आहे. एक लीटर दुधातून जेवढे प्रोटीन भेटतात तेवढे प्रोटीन १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यानं मिळतात. मुठभर शेंगदाण्यामध्ये ४२६ कॅलरीज, ५ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि १७ ग्रॅम प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के आणि बी ६ भरपूर प्रमाणात मिळते.

) शेंगदाण्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल असते. त्यामुळे शेंगदाण्याच्या सेवनानं पोटाचे आजार नष्ट होतात. गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.

) शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण असते. त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. हाडांच्या आजारावर हा उत्कृष्ट उपचार आहे.

) शेंगदाण्यामध्ये पॉलीफोनोलिक अँटीऑक्सीडचे प्रमाण अधिक असते. त्यामध्ये पोटाचा कर्करोग कमी करण्याची क्षमता असते



) शेंगदाणे खोकल्यामध्ये उपयुक्त औषधीचे काम करतात. याच्या सेवनानं पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते

) शेंगदाणे गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले मानले जातात. गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.

) शेंगदाण्यात ओमेगा ६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर आहेत. शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.


) शेंगदाणे खाल्ल्यानं तब्बेत चांगली राहते आणि शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.

) आठवड्यातून ४-५ दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाशी निगडीत आजारांचा धोका कमी होतो

) शेंगदाणे खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतेलिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची मात्रा ७.४ टक्क्यांनी घटते.



१०) शेंगदाण्यात प्रोटीन, फायबरखनिजव्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतेयामुळे त्वचा नेहमी तरूण राहते.

११) नियमित शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.



हेही वाचा

ब्लॅक टी आरोग्यासाठी 'चवदार'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा