Advertisement

ब्लॅक टी आरोग्यासाठी 'चवदार'


ब्लॅक टी आरोग्यासाठी 'चवदार'
SHARES

चहा हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा दिवस चहानेच सुरू होतो. अनेकांना तासातासाला चहा प्यावासा वाटतो. पण चहा हा काही एक प्रकारचा नसतो. चहाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ब्लॅक टी. ब्लॅक टी म्हणताच अनेकांची तोंडं वाकडी झाली असतील. 



कारण त्यात दूध नसल्यानं त्याला कसली चव नसते. त्यामुळे बहुतेक जण ब्लॅक टीपासून लांबच राहतात. पण ब्लॅक टी हा चहाचा प्रकार केवळ फ्रेशनेससाठी नाही तर औषध म्हणूनही प्राशन केला जातो. ब्लॅक टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच ब्लॅक टीचे काय फायदे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे फायदे वाचून तुम्ही रोज ब्लॅक टीचे प्राशन कराल.



1) अन्य पेयांच्या तुलनेत ब्लॅक टीमध्ये कॅफीनची मात्रा कमी असते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राखला जातो.

2) ब्लॅक टीमध्ये टॅनीन नावाचे द्रव्य असते आणि ते आपल्या पचनसंस्थेसाठी उपयुक्त असते. यामुळे पचनक्रिया सुधारून पोटाच्या आजारांशी संबंधीत अनेक आजार दूर होतात.

3) ब्लॅक टीमध्ये पॉलिफिनॉल्स असते. ज्यामुळे तंबाखू आणि इतर विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. याशिवाय कॅन्सरचा धोका कमी करण्यास देखील मदत होते.



4) ब्लॅक टीमुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

5) ब्लॅक टीचे रोज प्राशन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

6) ब्लॅक टीमुळे तोंडात कॅव्हीटी निर्माण होत नाही. त्यामुळे दातांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.



7) ब्लॅक टीमध्ये पोटॅशियम असल्यानं हार्टशी निगडीत समस्या दूर होतात.

8) ब्लॅक टीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असल्यानं वजन कमी होण्यासही मदत होते.

9) ब्लॅक टीमुळे स्टोनची समस्या दूर होते. नियमित ब्लॅक टी घेणाऱ्यांना किडनी स्टोन होण्याची शक्यता ८ टक्के कमी होते.



हेही वाचा

एक कप चहा आणि त्याचे 75 फ्लेवर्स!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा