दादरमधील खवैय्यांसाठी पर्वणी

दादर - दादरमधील खवैय्यांसाठी एक खुशखबर. शामसवेरा, लल्ला मुसलदार, शुरवेदार चिकन, नल्ली रोगन आणि गुलाबे गुलकंद असे हटके पदार्थ चाखायचेत आणि तेही शेफ संजीव कपूर यांच्या हातचे. मग दादर पश्चिमच्या स्टार सिटी मॉलमध्ये 'द यलो चिली' हॉटेलला नक्की भेट द्या. शाकाहारीपासून ते मांसाहारीपर्यंत सर्व पदार्थाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. बुधवारी शेफ संजीव कपूर यांनी 'द यलो चिली' या हॉटेलच्या एका शाखेचे उद्घाटन केले.

संजीव कपूर यांनी देशभरात ‘द यलो चिली’ या नावाने हॉटेलची साखळी निर्माण केलीय. काही वर्षांपूर्वी संजीव कपूर मीरतमध्ये होते. मीरतमधल्या प्रसिद्ध चाटमध्ये पिवळ्या मिरच्यांचा वापर केला जातो. त्यावरूनच संजीव कपूर यांना 'द यलो मिरची' नावाने हॉटेल साखळी सुरू करावी असे सुचले. दादरकरांसाठी आता हे हॉटेल म्हणजे मेजवानी ठरणार हे मात्र नक्की.

Loading Comments 

Related News from फूड अँड ड्रिंक्स