• अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
SHARE

घाटकोपर - घाटकोपर पूर्वमधील पटेल चौक येथील बालाजी डोसा कॉर्नर या अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता पालिकेकडून हे दुकान पाडण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे पोलीस देखील हजर होते. पालिकेने नोटीस देऊनही त्यांनी जागा खाली न केल्यामुळे पालिकेने कारवाई केली गेली. तसंच येत्या दिवसात अजून काही अनधिकृत बांधकामावर दुकांनावर पालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता वर्तवली जाते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या