Advertisement

चिकन विंग्सचे २६ प्रकार ट्राय केलेत का?


चिकन विंग्सचे २६ प्रकार ट्राय केलेत का?
SHARES

तुम्हाला चिकन खायला आवडते. मग तुमच्यासाठी चिकनचाच एक भन्नाट प्रकार म्हणजे 'चिकन विंग्स'. हेच चिकन विंग्स तुम्हाला वेगवेगळ्या २६ फ्लेवर्समध्ये खायला मिळाले तर? मग ओशिवरा इथल्या 'फायर ऑफ विंग्स'मध्ये तुम्हाला २६ प्रकारचे 'चिकन विंग्स' खाता येतील.

बार्बिक्यू विंग्सला पसंती

२६ प्रकारच्या विंग्समध्ये सर्वात जास्त पसंती बार्बिक्यू विंग्सला दिली जाते. फायर ऑफ विंग्समध्ये बनवण्यात येणारा बार्बिक्यू सॉस अप्रतिम आहे. याच बार्बिक्यू सॉसचा वापर करून तयार केलेले बार्बिक्यू विंग्स खाण्याची मजाच काही और. चवीला थोडे गोड आणि तिखट अशी या बार्बिक्यू विंग्सची चव लागते. चटपटीत आणि तिखट खाण्याचे शौकिन असाल तर घोस्ट विंग्स नक्की ट्राय करा. प्रचंड तिखट असतात. त्यामुळे तीन-चार पाण्याच्या बॉटल घेऊनच बसा.विंग्स स्पेशल

बार्बिक्यू आणि घोस्ट विंग्स सोडले तर विंग्स आणखी वेगवेगळे प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. हनी मस्टड, लेमन पेपर, पेरी पेरी, फायर विंग्स स्पेशल, क्लासिक बफेलो आणि बरेच काही. या विंग्सचा आस्वाद घेण्यासाठी १५०-३५० रुपये मोजावे लागतील.

कुठे : फायर विंग्स, शॉप नंबर १, ओक्ज शॉपिंग सेंटर, गेट नंबर तीन जवळ, मिल्लत नगर, ओशिवरा, अंधेरी (प.)


हेही वाचा

आईस्क्रिमला महाराष्ट्रीयन तडका म्हणजे 'सिजलिंग पुरणपोळी'

चक्क! २४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रिम


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा