Advertisement

उन्हाळ्यात थंडगार, रसदार कलिंगड खाण्याचे १२ फायदे

उष्ण हवामानात शरीरात पाण्याची थोडीशी देखील कमतरता अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. पण सुर्याच्या या प्रकोपापासून वाचण्यासाठी कलिंगड नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

उन्हाळ्यात थंडगार, रसदार कलिंगड खाण्याचे १२ फायदे
SHARES

लयच उकाडा हाय राव... या कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडण्याची कुणाचीच इच्छा होत नाही. अंगाची अक्षरश: लाही लाही होते. अर्थात याचा परिणाम आरोग्यावरही होतोच. उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील उर्जाही बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशी देखील कमतरता अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. पण सुर्याच्या या प्रकोपापासून वाचण्यासाठी कलिंगड नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

  • उन्हाळ्यात प्रचंड घाम येत असल्यानं शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. तुमची पाण्याची कमतरता कलिंगड भरून काढू शकते. कारण कलिंगडमध्ये विपुल प्रमाणात पाणी असल्यानं त्याचा फायदा शरीराला होतो.
  • कलिंगडध्ये अधिक प्रमाणात पोषकतत्त्व असतात. यात व्हिटामिन्स ए, बी६ आणि विटामिन्स सी हे खूप मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय अँटिऑक्सिडेंट्स आणि अमिनो अॅसिडसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात.
  • कलिंगडमध्ये अँटीऑक्सीडेंट आणि व्हिटामिन सी अधिक असल्यानं कॅन्सरच्या विषाणूंना नष्ट करते. प्रोस्टेट कॅन्सरसाठी लाइकोपेनचे सेवन उपयुक्त असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. कलिंगडमध्येही लाइकोपेन तत्त्व आढळून येतात.
  • मुतखड्यावर कलिंगड गुणकारी आहे. कलिंगडात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यातील पोटॅशियम किडनीला स्वस्थ ठेवते. यामुळे लघवीतील अतिसारचा स्तर नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्यानं किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.
  • कलिंगडातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर आहे. यामुळे रक्त गोठणे, स्ट्रोक, हार्ट अटॅक यांचा धोका दूर करतो.
  • कलिंगडाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यानं डोळे स्वस्थ ठेवण्यात मदत होते. त्याच्या सेवनानं रातआंधळेपणा आणि मोतीबिंदू यासारख्या डोळ्यांच्या आजारापासून दूर राहिले जाऊ शकते.
  • खाण्यावरील बंधनामुळे मधुमेहींना सतत उर्जेची कमतरता आणि थकवा जाणवत असतो. अशावेळी सर्वात उत्तम म्हणजे कलिंगड किंवा त्याचा ज्यूस.
  • त्वचा आणि केसांसाठी कलिंगड उत्तम उपाय आहे. सी व्हिटॅमिनचे सेवन कोलेजन निर्माण करण्यास आवश्यक असते. हे त्वचा आणि केसांसाठी संरचना तयार करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही अधिक हायड्रेट राहता.
  • कलिंगडमध्ये पाणी आणि फायबर अधिक प्रमाणात असते. त्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या दूर होतात.
  • वजन कमी करण्यासाठी कलिंगड हे सर्वात उत्तम फळ आहे. यामध्ये असेलेले सिट्रयूलाइन नावाचं तत्व शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते
  • कलिंगडमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याचं कारण की कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असेत. व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते
  • विज्ञानात कलिंगडला वायग्रापेक्षा जास्त प्रभावकारी मानले जाते. कलिंगडचे सेवन केल्यानं प्रणयशक्ती वाढते. एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे की, कलिंगडमुळे सेक्स जागृत करणारा हार्मोन्स टेस्टास्टेरॉन उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो.

हेही वाचा

उन्हाळ्यात अंगाला खाज उठते? या ७ घरगुती उपायांनी करा समस्या दूर

गॉगल निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा