मार्गशीर्ष महिन्यात ट्राय करा 'या' हटके रेसिपी

दिवसभर उपवास करून रात्री लक्ष्मीमातेला नैवैद्य दाखवून उपवास सोडला जातो. या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नव-नवीन रेसिपी.

SHARE

मराठी महिन्यातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक सौभाग्यवती स्त्रिया महालक्ष्मीचं व्रत करतात. या महिन्यात मांसाहार केला जात नाही. या महिन्यामध्ये दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. या दिवशी महिला लक्ष्मीमातेचं व्रत करून उपवास करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री लक्ष्मीमातेला नैवैद्य दाखवून उपवास सोडला जातो. या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नव-नवीन रेसिपी


१) उपवासाचे कटलेट

साहित्य 

 • राजगिरा लाही ४ वाट्या
 • उकडलेले मोठे 2 बटाटे
 • कोथिंबीर आवडीनुसार
 • दाण्याचे कूट 2 चमचे
 • आलं किसून 1 चमचाभर
 • हिरवी मिरची वाटून 2 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • जिरा पावडर – 1चमचाभर
 • साखर चिमूटभर

कृती

प्रथम बटाटे शिजवून घ्यावे. मिरची कोथिंबीर आलं सगळं वाटून घ्यावं. एका बोलमध्ये राजगिरा लाही, वाटण आणि बटाटे एकत्र करून घ्यावेत. मीठ, साखर, जिरा पावडर, दाण्याचे कूट सगळं घालून मिक्स करून घ्यावे. त्याच्या लहान टिक्क्या बनवून पॅनमध्ये पॅटीस शॅलो फ्राय करावेत.

उपवासाची चटणी बनवण्यासाठी दाण्याचं कूट, दही, साखर, तिखट, मीठ हे मिश्रण एकत्र करावे.


२) पातोळ्या

 • हळदीची पाने
 • तांदळाचे पीठ
 • गूळ
 • ओलं खोबरं
 • वेलची
 • तूप

कृती

हळदीची पाने स्वच्छ धुवून दोन तुकडे करून पाणी निथळायला ठेवणे. तांदळाच्या पिठात मीठ आणि पाणी घालून पानावर पसरता येईल इतकं पीठ सैल भिजवून घेणं. दुसऱ्या बाजूला गूळ घालून ओलं खोबरं कढईत परतून घेणे. त्यामध्ये तूप आणि वेलची पावडर टाकणे. पानावर पीठ पसरवून त्यामध्ये खोबऱ्याचा चून घालून दुमडून ठेवणे. त्यानंतर कढईत पाणी गरम करायला ठेवणे. अळूवडीप्रमाणे दुमडून ठेवलेली पानं चाळणीत ठेऊन त्यावर झाकण ठेऊन वाफवून घेणं

) उपवासाचे अप्पे

 • तांदळाचे पीठ १ वाटी
 • आलू 3
 • मिरची
 • जीरा
 • मीठ
 • बेकिंग पावडर
 • दही
 • तेल

कृती

प्रथम वरीचे तांदूळ भिजायला घालून ठेवा. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात बेकिंग पावडर, बटाटे, मिरची पेस्ट, मीठ, दही,जीरा पावडर टाकून मिक्स करा. हे मिश्रण अप्पे पात्रात टाकून शिजवा. शिजवल्यावर ते अप्पे डिश मध्ये गोड दह्यासोबत सर्व्ह करा. अप्पे खाण्यासाठी दुसरी चटणी शेंगदाण्याची वापरू शकता


उपवासाचे घावण

 • १ वाटी वरी तांदूळ
 • १ वाटी साबुदाणे  
 • २ हिरव्या मिरच्या
 • २ चमचे नारळाचा चव    
 • २ चमचे दाण्याचे कूट
 • चवीपुरते मीठ    
 • साजूक तूप

कृती

साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. साबुदाणा आणि वरी तांदळात अधिक पाणी घालावे. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे. दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजानं मिक्सरमध्ये पाणी घालावे. नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेनं एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली की दुसरी बाजू नीट होवू द्यावी.हेही वाचा

गल्लीबेल्ली : चविष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी

मुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच


संबंधित विषय
ताज्या बातम्या