Advertisement

गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये आणखी १५०० खाटांची सुविधा

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव पूर्वेकडील नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये आणखी १५०० रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये आणखी १५०० खाटांची सुविधा
SHARES

कोरोनाबाधित रुग्णांची (coronavirus) वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव पूर्वेकडील नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये आणखी १५०० रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतीच या केंद्राला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त (विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त (पी- दक्षिण) संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता उपस्थित होते.

मुंबईतील (mumbai) रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव १५०० बेड्स कार्यान्वित करण्याचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे. यापैकी ५०० बेड्स ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असतील. १५ एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचं आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिलं. सध्या उपलब्ध असलेल्या २९०० खाटांसह एकूण ४३०० रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल.

यावेळी डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसंच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. सोबतच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोकेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली.

हेही वाचा- आजच मोठा निर्णय अपेक्षित, अस्लम शेख यांची माहिती

दरम्यान, या कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशिन– सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. दरम्यान, नेस्को कोविड सेंटरची गरज व रुग्णसेवेसाठी आमदार निधीतून दोन्ही मशिन्स देण्याचं मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी मान्य केलं व लवकरात लवकर या मशिन्स रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील, असं स्पष्ट केलं.

सेंटरमध्ये रेमडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे १००० व्हायल्स उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात अधिक भर पडणार आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरिक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना सुभाष देसाई यांनी दिल्या. नेस्को संकुलात आतापर्यंत १,१७,००० व्यक्तींचं लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला असून दररोज ६ हजार  व्यक्तींचं लसीकरण पूर्ण केलं जात आहे.

(1500 more beds added in nesco jumbo covid 19 center goregaon mumbai)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा