Advertisement

ठाण्यात आढळला H1N1 चा पहिला रुग्ण


ठाण्यात आढळला H1N1 चा पहिला रुग्ण
SHARES

या वर्षीच्या पावसाळ्यात २९ वर्षीय महिला स्वाइन फ्लू (H1N1) व्हायरसचा पहिला शिकार ठरली आहे. ३० आॅगस्ट रोजी या महिलेली स्वाइन फ्लू टेस्ट पाॅझिटीव्ह आली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेने सर्व रहिवाशांना स्वाईन फ्लूपासून वाचण्यासाठी गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या वर्षी ठाण्यात H1N1 व्हायरसच्या संसर्गाने १६ जणांचा मृत्यू झाला होता.

या महिलेला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेची रक्त तपासणी केल्यावर तिला H1N1 व्हायरसची लागण झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. महापालिकेच्या कळवा रुग्णालयात देखील H1N1 रुग्णांकरीता विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.



काय आहे स्वाइन फ्लू?

स्वाइन फ्लू या आजाराला मेक्सिकन फ्लू, स्पॅनिश फ्लू, एच १ एन १, इन्फ्लूएंझा ‘ए’ या नावांनी देखील ओळखलं जातं. डुकरांमधील टाईप 'ए' एनफ्ल्‍युएन्‍जा विषाणुंच्‍या संक्रमणामुळे या रोगाची लागण होते. या रोगाचा संबंध श्‍वसन प्रक्रियेशी येत असल्‍याने या रोगाला 'श्‍वास रोग' असंही म्‍हणतात.


लक्षणे काय?

या रोगाचे विषाणू तसं तर वर्षभर वातावरणात असतात. मात्र हिवाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यात हवेतून पसरू लागतात. ताप, खोकला, घशाला कोरड, अंग व डोकेदुखी आणि मळमळून उलट्या होणं ही 'स्वाइन फ्ल्‍यू'ची लक्षणे आहेत. या रोगाची लागण आणि संसर्ग होऊ नये म्हणून नाक आणि तोंड मास्‍कने झाकून ठेवावे.

या रोगाची लक्षणे दिसल्‍यावर डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली Tamiflu किंवा Relenza यासारखी औषधे घेता येतात. मात्र ती घेताना या औषधांची मुदत संप‍लेली नाही ना? तसंच त्यांचे डोस योग्य आहेत का? त्याची डाॅक्टरांकडून खात्री करून घ्‍यावीत.



हेही वाचा-

स्वाइन फ्लू आला, तब्येत सांभाळा

मुंबईत स्वाईन फ्लूचे 21 रुग्ण



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा