Advertisement

Coronavirus : ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा ४१६

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता ४१६ वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे २४ तासांत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus : ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा ४१६
SHARES

कोरोना संदर्भात मुंबईकरांची चिंता वाढवणारे आकडे समोर आले आहेत. मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६२वर गेली आहे. तर आज दिवसभरात महाराष्ट्रात ८१ नवे रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता ४१६ वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे २४ तासांत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात ६, पिंपरी चिंचवडमध्ये ३, मुंबईमध्ये ५७, ठाण्यात ५, नगरमध्ये ९ आणि बुलढाण्यात १ अशा ८१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५ नविन रूग्‍ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्‍णसंख्‍या आता १९ वर पोहोचली आहे. नवीन रूग्‍णांपैकी ४ रूग्‍ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून १ रूग्‍ण कल्‍याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील ३ रुग्‍ण हे लग्‍न सोहळयाशी संबंधीत असून १ रूग्‍ण कोरोनाबाधित रूग्‍णाचा सहवासित आहे. नवीन रूग्‍णांपैकी कल्‍याण पुर्व येथील रूग्‍ण हा एका खाजगी रूग्‍णालयात उपचार घेत आहे. तर डोंबिवली इथले चारही रूग्‍ण कस्‍तुरबा रूग्‍णालय, मुंबई इथं उपचार घेत आहेत.

दोन जणांना डिस्चार्ज

कल्‍याण शहरात प्रथम आढळलेला कोरोनाबाधित रूग्‍ण आणि त्‍याच्या कुटुंबातील २ सदस्य उपचारादरम्यान पुर्णपणे बरे झाले आहेत. त्‍यांना डिस्चार्जही देण्‍यात आला आहे. सध्‍या कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पुर्नतपासणीअंती डिस्चार्ज दिलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या आता ४ झाली आहे. सद्यःस्थितीत महापालिका क्षेत्रातील एकूण १५ कोरोनाबाधित रूग्‍ण रूग्‍णालयात उपचार घेत आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतील (Dharavi) ५६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णाला सायन (Sion Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या १ हजार ७०० च्या पार गेली आहे. दिल्लीतील (Delhi) मरकज इथं झालेल्या परिषदेनंतर देशभरात कोरोना (Covid - 19) पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात धारावीत कोरोना रुग्ण सापडल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे.



हेही वाचा

Coronavirus Update: कोरोनाचं निदान फक्त ५ मिनिटांत, रॅपिड टेस्टला परवानगी मिळाली

संचारबंदी नव्हे, स्वमग्न मुलांना समजून घेण्याची सुवर्णसंधी!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा