Advertisement

मुंबईतल्या 'या' ५ वॉर्डात मलेरियाचे ७० टक्के रुग्ण

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातील सुमारे ७० टक्के रुग्ण मुंबईतील या ५ प्रभागांतून नोंदवली गेली आहेत.

मुंबईतल्या 'या' ५ वॉर्डात मलेरियाचे ७० टक्के रुग्ण
SHARES

मलेरियाच्या घटनांमध्ये अधिकृत आकडेवारीनुसार वाढ दिसून येत आहे. गेल्या ८ महिन्यांत शहरातून एकूण ३ हजार ०९९ मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातील सुमारे ७० टक्के प्रकरणं दक्षिण मुंबईतील ५ प्रभागांमधून आली आहेत. ३ हजार ०९९ पैकी २ हजार १५७ प्रकरणं ही दक्षिण मुंबईतल्या वॉर्ड D, E, F, G south आणि  G North या वॉर्डमधून नोंदवली गेली आहेत.

अधिकाऱ्यांनी पूर्वी सांगितलं आहे की, मलेरियाच्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीचं मुख्य कारण म्हणजे बांधकाम सुरू असलेल्या इमारती आणि मेट्रोचं काम आहे. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी कामं बंद आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पाणी साचून मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होत आहे.

एकूण मलेरियाच्या सुमारे ७० टक्के रुग्णांपैकी मुंबईतील 5 प्रभागांपैकी जी दक्षिणात 31 ऑगस्टपर्यंत सर्वाधिक म्हणजेच १ हजार ०५५ रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे ई वॉर्डमध्ये मलेरियाचे ४७८ तर एफ दक्षिणमध्ये २६७ रुग्ण आढळले आहेत. तर प्रभाग जी उत्तर आणि डी मध्ये अनुक्रमे २३३ आणि १२४ रुग्ण नोंदवली गेली आहेत.

हेही वाचा : इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

पालिका अधिकाऱ्यांनी मलेरियाच्या डासांच्या उत्पत्तीची अनेक ठिकाणं नष्ट केली आहेत. पण कोरोना काळात अनेक रहिवासी मुंबई सोडून निघून गेले. त्यामुळे रिकाम्या घरात डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे चिंता वाढली आहे. याशिवाय मेट्रोचं काम चालू असेल्या ठिकाणी देखील मलेरियाच्या डासांची उत्पत्ती वाढत आहे.

मलेरियासाठी दरवर्षी पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपायांवर सगळेच समाधानी नाहीत. “दरवर्षी धारावी आणि गोवंडीसारख्या झोपडपट्ट्यांमधून मलेरियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. असं असूनही, पालिकेनं या भागात फवारणी केली नाही. शिवाय डासांची पैदास करणारी मैदानं साफ केली नाहीत. लॉकडाऊनमुळे बहुतेक लोक आत राहत असल्यानं या गर्दीग्रस्त भागात राहणाऱ्या बर्‍याच जणांना मलेरिया होत आहे आणि ही संख्या आणखी वाढेल," असं मत रुग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्थेचे जितेंद्र तांडेल यांनी व्यक्त केलं आहे.

मलेरियाच्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर असं आव्हान आहे की, COVID 19 ची लक्षणं मलेरियासारखीच आहेत. हे लक्षात घेऊन मलेरियाच्या उपचारात येणाऱ्यांचीही COVID 19 ची चाचणी केली जात आहे.

बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टिंग जनरल फिजीशियन डॉ. गौतम भन्साळी म्हणाले की, मुंबईत अशा केसेस आढळल्या आहेत. एकाच व्यक्तीला मलेरिया होऊन मग कोरोना झाला. तर काहिंमध्ये मलेरिया आणि कोरोना असे दोन्ही आजार आढळले.

आतापर्यंत मलेरिया आणि COVID 19 या दोन्ही आजारांच्या संसर्गामुळे दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक २७ वर्षांचा तरूण होता. जो G North वॉर्डचा होता. तर दुसरा M east मधील ४० वर्षांचा तरुण होता. दोन्ही मृत्यू ऑगस्टच्या सुरूवातीस झाले.



हेही वाचा

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा