Advertisement

महापालिकेचा प्रताप! मराठी शिक्षकांना गुजराती भाषेत प्रशिक्षण!!

सोमवारी २४ सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे लस देण्याबाबतच्या प्रशिक्षण शाळेचं आयोजित करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण शाळेत मनपाच्या शिक्षकांना चक्क गुजरातीतून प्रशिक्षण देण्यात आलं.

महापालिकेचा प्रताप! मराठी शिक्षकांना गुजराती भाषेत प्रशिक्षण!!
SHARES

'गोवर' या आजाराचं निर्मूलन आणि 'रुबेला' या रोगावर नियंत्रणासाठी काही विशिष्ट लस नागरिकांना देण्यात येते. सोमवारी २४ सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे लस देण्याबाबतच्या प्रशिक्षण शाळेचं आयोजित करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण शाळेत मनपाच्या शिक्षकांना चक्क गुजरातीतून प्रशिक्षण देण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.


कुठे होतं प्रशिक्षण शिबीर?

सोमवारी २४ सप्टेंबर रोजी मनपाच्या काही शिक्षकांना 'गोवर' व 'रूबेला' या रोगाची लागण होऊ नये म्हणून नागरिकांना लस देण्यात येते. ही लस कशाप्रकारे द्यायची त्याबाबतचं हिंदू कॉलनीत काही मराठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान लसीकरण कसं द्याच याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात येणार होती. परंतु ही माहिती मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून न देता चक्क गुजराती भाषेतून देण्यात आल्यानं प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर शिक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


मनपाच्या काही शिक्षकांना 'गोवर' लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सोमवारी आरोग्य प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व मराठी शिक्षक असतानाही लसीकरणाचं प्रशिक्षण गुजराती भाषेतून कसं काय देऊ शकतात? तुम्हाला इतका गुजराती भाषेचा पुळका आला असेल, तर गुजरातमध्ये जा तिथे गुजराती भाषेत प्रशिक्षण द्या. महाराष्ट्रात मराठी भाषिक लोक राहत असून सर्व ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. या प्रकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तर्फे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
- संदीप देशपांडे, नेता, मनसे



हेही वाचा-

शिक्षकांना चॅनेलवरुन देण्यात येणारं प्रशिक्षण मराठीतच - विनोद तावडे

सर्जिकल स्ट्राईक दिन पाळा, यूजीसीचे काॅलेज, विद्यापीठांना आदेश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा