Advertisement

रेल्वेत सापडलेल्या बाळाचं कामा रुग्णालयात बारसं


रेल्वेत सापडलेल्या बाळाचं कामा रुग्णालयात बारसं
SHARES

चर्चगेट स्थानकावर २९ जून रोजी सायंकाळी रेल्वे पोलिसांना एक ५ दिवसांची बालिका सापडली होती. हे बाळ पोलिसांनी कामा रुग्णालयाकडे उपचारासाठी स्वाधीन केलं होतं. खूपच अशक्त असलेल्या या बाळाची एका  महिन्यानंतर तब्येत सुधारली असून गुरूवारी या बाळाचं मोठ्या उत्साहात कामा रुग्णालयातील डाॅक्टर अाणि परिचारिकांनी बारसं केलं.  'अहिल्या असं या नाव या बाळाचं ठेवण्यात अालं अाहे. अहिल्याची प्रकृती अाता चांगली असल्याने तिला शुक्रवारी पुन्हा चर्चगेट रेल्वे पोलिसांकडं स्वाधीन केलं अाहे. अाई-वडिलांनी रेल्वेत सोडलं

हृदयाला छिद्र पडल्याने अहिल्याच्या अाई-वडिलांनी तिला २९ जून रोजी सायंकाळी चर्चगेट स्थानकावर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये सोडून दिलं होतं. स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी या बाळाला अापल्या ताब्यात घेतलं. मात्र, अवघ्या ५ दिवसांच्या या बाळाची प्रकृती खालावली होती. त्यामुळे उपचारासाठी तिला कामा रुग्णालयात नेलं. रुग्णालयातील सीसीयू विभागात तिला ठेवण्यात अालं. तिचं वजन यावेळी अवघं ६०० ग्रॅम इतकं होतं. रुग्णालयातील डाॅक्टर अाणि परिचारिकांनी तिची चांगली काळजी या एका महिन्यात घेतली. अाता एक महिन्यांनंतर तिचं वजन अडीच किलो झालं अाहे. अनाथ असलेल्या या बाळाचं बारसंही त्यांनी मोठ्या उत्साहात साजरं केलं. बाळाला ठेवण्यात अालेली खोलीची सजावटही केली होती.पोलिसांना बाऴ सापडलं तेव्हा त्याला संसर्ग झाला होता. एक महिन्यांच्या विशेष उपचारानंतर आज हे बाळ पूर्णतः सुदृढ झालं आहे. या बाळाला नवी ओळख देण्यासाठी अाम्ही तिचं बारसं केले. या गोंडस बाळाचे नाव 'अहिल्या' ठेवण्यात आलं आहे.  या बाळाला रूग्णालयातील मातृ दुग्धपेढीतील दूध दिलं जात होतं.  
- डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालयहेही वाचा -

केमोथेरपीशिवाय स्तनाचा कर्करोग होणार बरा

आरोग्यसेविकांचं आझाद मैदानात आंदोलन
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement