Advertisement

काॅलेज कुमार म्हणणार 'आय एम अ ऑर्गन डोनर'

साधारणपणे ब्रेनडेड व्यक्तीचंच अवयवदान केलं जातं. पण, अनेकदा अवयवदानाबाबत जनजागृती नसल्याने लोक सहजासहजी अवयवदानासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळेच मुंबईसह राज्यातील मेडिकल कॉलेज आणि इतर काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी त्यांच्या आयडीवर 'आय एम अ ऑर्गन डोनर' असं लिहिलं जाणार आहे.

काॅलेज कुमार म्हणणार 'आय एम अ ऑर्गन डोनर'
SHARES

अवयवदानाची वाढती गरज पाहता सरकारकडून प्रत्येक पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालावधीत अवयवदानाचे धडे दिले, तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे येत्या वर्षभरात कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर (आयडीकार्ड) अवयवदान करण्यासाठी इच्छुक आहात की नाही? याची माहिती लिहिली जाणार आहे.

जनजागृती करण्यासाठी

साधारणपणे ब्रेनडेड व्यक्तीचंच अवयवदान केलं जातं. पण, अनेकदा अवयवदानाबाबत जनजागृती नसल्याने लोक सहजासहजी अवयवदानासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळेच मुंबईसह राज्यातील मेडिकल कॉलेज आणि इतर काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी त्यांच्या आयडीवर 'आय एम अ ऑर्गन डोनर' असं लिहिलं जाणार आहे.

पत्र पाठवून विनंती

या संदर्भात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने राज्याच्या तंत्र आणि उच्च शिक्षण विभागाला लेखी पत्र पाठवून विनंती केली होती. या उपक्रमासाठी तंत्र आणि उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिल्यास महाविद्यालयीन आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या आयडी कार्डवर ‘मी अवयवदाता…’ असा मजकूर छापण्यात येईल. जेणेकरून व्यक्ती ब्रेनडेड झाल्यास डॉक्टरांना त्याची अवयवदानाची इच्छा लगेचच कळू शकेल आणि अवयवदानाच्या प्रक्रियेला उशीर होणार नाही.

रुग्णांना फायदा

'२५ ते ६० वयोगटातील लोकांचे अवयवदान करता येतात. अपघात केसेसमध्ये जास्त प्रमाणात अवयवदान केलं जाऊ शकतं. पण, एखादी व्यक्ती अपघातात मृत्यू पडली तर त्याच्या कुटुंबियांना अवयवदानाबद्दल समजावे पर्यंत उशीर होतो. शिवाय, अवयवदानाची प्रक्रिया देखील खूप किचकट असते. वेळच्यावेळी अवयवदान केले तर त्याचा फायदा प्रतिक्षा यादीत असणाऱ्या रुग्णांना तात्काळ होऊ शकतो.
- डॉ. प्रवीण शिंगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि संशोधन

हेही वाचा-

दहावीच्या पुस्तकात अवयवदानाचाही समावेश

अवयवांसाठी अॅपच्या माध्यमातून करा नोंदणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा