Advertisement

म्हाडाने दिले कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १०० गाळे

म्हाडाच्या १८८ उपलब्ध असलेल्या गाळ्यांपैकी १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.

म्हाडाने दिले कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १०० गाळे
SHARES

मानवतेच्या दृष्टीकोनातून कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या दृष्टीने शासनाने पहिल्यांदाच म्हाडाच्या १८८ उपलब्ध असलेल्या गाळ्यांपैकी  १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. हे १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरित केल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गृहनिर्माण विभाग (म्हाडा) व टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉक्टर शैलेश श्रीखंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

टाटा मेमोरियल रूग्णालय हे कर्करोग रूग्णांवर उपचार करण्यासाठी नावाजलेलं रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णांवरील उपचारासाठी फक्त महाराष्ट्रातूनच (maharashtra) नव्हे, तर संपूर्ण भारतातून कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतू त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बऱ्याचदा नातेवाईकांना फुटपाथवर रहावं लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. 

हेही वाचा- दोन आठवड्यांत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांपर्यंत, दिवसाला हजार मृत्यूंची शक्यता

ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने रूग्णालयाशेजारी असलेल्या परळ शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ. बी. ए. रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण १८८ गाळे प्राप्त झाले आहेत. यापैकी सद्य:स्थितीत ३०० चौरस फूट असलेले १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

गाळ्यांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच  कारारनामा करण्यात येणार आहे. व उर्वरित गाळे लवकरच टाटा मेमोरियल रूग्णालयाला सुपूर्द करण्यात येईल, असंही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा