Advertisement

मुंबईकरांनो, सांभाळा! सर्वाधिक डायबिटिज पेशंट मुंबईत!

'वर्ल्ड डायबिटिज डे'च्या पार्श्वभूमीवर एका सर्वेक्षणातून मुंबईसंदर्भात बाहेर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. देशभरात मुंबईत सर्वाधिक डायबिटिज पेशंट असल्याचं या आकडेवारीतून समोर आलं आहे.

मुंबईकरांनो, सांभाळा! सर्वाधिक डायबिटिज पेशंट मुंबईत!
SHARES

देशाची आर्थिक राजधानी म्हणून मानाने मिरवणाऱ्या मुंबईला बहुधा या मानाचं गोड थोडं जास्तच झालं असावं. कारण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशभरात सर्वाधित डायबिटिज पेशंट अर्थात मधुमेहाचे रूग्ण मुंबईत आहेत. 'वर्ल्ड डायबिटिज डे'च्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणातून आलेली ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

इंटरनॅशनल डायबिटिज फेडरेशनने (आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्था) केलेल्या सर्वेनुसार भारतात सर्वाधिक डायबिटिज पेशंट मुंबईत आहेत. गेल्या साडेतीन वर्षात या संस्थेतर्फे मुंबईसोबतच देशभरातल्या 8 प्रमुख शहरांमध्ये हा सर्वे घेतला गेला.


कसा घेतला सर्वे?

  • साडेतीन वर्ष चालला सर्वे
  • देशातल्या 8 प्रमुख शहरांमध्ये घेतला सर्वे
  • सर्वेसाठी तब्बल 6 कोटी 30 लाख नमुने घेतले
  • मुंबईतल्या नमुन्यांपैकी 23.74% लोकांना डायबिटिज झाल्याचं निष्पन्न

या सर्वेक्षणानुसार, भारतातल्या 6 कोटी 90 लाख लोकांना डायबिटिजची समस्या असून दरवर्षी 3 लाख 50 हजार रूग्ण डायबिटिजने दगावतात. "जर याच वेगाने भारतातील डायबिटिजचे पेशंट वाढत गेले, तर या बाबतीत चीनला मागे टाकत भारत क्रमांक एकचा देश बनेल. कारण डायबिटिज झालेले सर्वाधिक रुग्ण हे तरूण वयोगटातले आहेत", अशी प्रतिक्रिया एसआरएल डायग्नोस्टिक्सचे डॉ. बी. आर. दास यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.हेही वाचा

वर्ल्ड डायबिटीज डे स्पेशल - महिलांनी काय काळजी घ्यावी?


Read this story in English
संबंधित विषय