Advertisement

कट प्रॅक्टिसच्या कायद्यासाठी ऑनलाईन सूचना, हरकतींची मुदत संपली


कट प्रॅक्टिसच्या कायद्यासाठी ऑनलाईन सूचना, हरकतींची मुदत संपली
SHARES

वैद्यकीय क्षेत्रात 'कट प्रॅक्टीस' म्हणजेच कमिशनपद्धती याच्या विरोधातील कायद्याच्या मसुद्यावर सूचना आणि हरकती सुचवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं. आता ही दीड महिन्यांची मुदत नुकतीच २५ आॅक्टोबर २०१७ ला संपली असून लवकरच हा कायदा अंतिम स्थितीत येणार आहे. त्यानंतर या कायद्याच्या पूर्णतेला अधिक गती मिळताना दिसणार आहे.

कट प्रॅक्टिसविरोधी कायद्यात तयार करण्यात आलेल्या मसुद्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सूचना आणि हरकती सुचवल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने दिली.


लोकांनी सुचवलेल्या सूचना आणि हरकती -

शस्त्रक्रियेचा खर्च, अावाजवी तपासण्यांची यादी यापासून ते थेट खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून आकारण्यात येणारी कन्सल्टेशन फी या सगळ्या मुद्द्यांविषयी सूचना मांडल्या आहेत. या सर्व सूचना आणि हरकतींंपैकी कोणत्या सूचनांवर विचार करायचा याविषयी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिंगारे यांनी दिली.


कट प्रॅक्टिस रोखण्यासाठी नियमावली

कट प्रॅक्टिसविरोधातील कायदा तयार करण्यासाठी गठीत केलेल्या समितीनेही शिफारसी मागवल्या होत्या. त्याला मिळालेला प्रतिसाद चांगला असून यातील प्रत्यक्षात आणता येऊ शकतील, अशा सूचनांवर विचारविनिमय करून त्यांचाही समावेश कायद्याच्या मसुद्यात करण्यात येणार आहे. कट प्रॅक्टिस रोखण्यासाठी विविध देशांमध्ये नियमावली तयार करण्यात आली आहे. पण, भारतातील सामाजिक वातावरण, सातत्याने वाढत गेलेली लोकसंख्या, निरक्षरता लक्षात घेता रुग्णांची डॉक्टरांकडून होणारी लूटही वाढत आहे.

रुग्णसेवेवरचा भुर्दंड या कायद्यामुळे कमी होईल आणि त्याचवेळी डॉक्टरांचीही समाजातील प्रतिमा अधिक सक्षम होईल, असाही विश्वास या समितीमधील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.



हेही वाचा - 

कट प्रॅक्टिसच्या मसुद्यावर ऑनलाईन सूचना आणि हरकती

108 रुग्णवाहिकेच्या सेवेत कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा