SHARE

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी (MDACS) या मुंबई महापालिकेच्या संस्थेसोबत ‘वन रूपी क्लिनिक’ने करार केला असून या करारानुसार येत्या १ डिसेंबरपासून ‘वन रूपी क्लिनिक’ रेल्वे प्रवाशांना मोफत एड्स चाचणी, एड्स उपचार आणि सल्ला आदी सुविधा देणार आहे.


इथं करता येईल चाचणी

रेल्वे प्रवाशांना अत्यंत कमी दरांत तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने मुंबईतील दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, वडाळा रोड, मानखुर्द, वाशी इ. अशा महत्त्वाच्या स्थानकांवर 'वन रुपी क्लिनिक' सुरू करण्यात आली आहेत. त्यात आता मोफत 'एचआयव्ही'ची चाचणी, उपचार आणि सल्ला या सेवेचे भर पडणार आहे.


येत्या १ डिसेंबरला प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मानखुर्द स्टेशनपासून आम्ही सुरूवात करणार आहोत. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता पुढील स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात येईल. 'मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी'तर्फे क्लिनिकला किट पुरवलं जाणार आहे. लोक सहजासहजी 'एचआयव्ही टेस्ट' करायला जात नाहीत. पण, ते आमच्याकडे चाचणीसाठी आले आणि दुर्देवाने एखाद्याला एचआयव्ही असेल, तर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करता येतील.

- डॉ. राहुल घुले, वन रुपी क्लिनिक, संस्थापक


हॉस्पिटलमध्ये दर किती?

एका सामान्य रुग्णाला 'एचआयव्हीच्या टेस्ट'साठी जनरल लॅबमध्ये कमीत कमी २५० रुपये द्यावे लागतात. महापालिकेच्या रुग्णालयात ही टेस्ट मोफत केली जाते. तर, खासगी रुग्णालयात याच टेस्टसाठी जवळपास ७०० ते ८०० रुपये आकारले जातात.


वन रुपी क्लिनिकच्या डॉक्टरांना आम्ही सोमवारी 'एचआयव्ही टेस्ट'बद्दल ट्रेनिंग देणार आहोत. त्याशिवाय त्यांना टेस्टिंग किट्सही पुरवणार आहोत. ओपीडीत एखादा रुग्ण आल्यावर त्याची टेस्ट करुन त्याला लगेच रिपोर्ट देण्यात येईल. त्यानुसार त्याच्यावर पुढील उपचार सुरू करणं सोपं होईल.

- डॉ. श्रीकला आचार्य, अॅडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर, 'एमडीएसीएस'हेही वाचा-

वन रुपी क्लिनिक पुरवणार शस्त्रक्रियेची सेवा

'येथे' करा मोफत ब्लड प्रेशर तपासणी


संबंधित विषय
ताज्या बातम्या