Advertisement

पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज प्रकरण - वसतीगृहाची मागणी मान्य, तरीही आंदोलन सुरूच


पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज प्रकरण - वसतीगृहाची मागणी मान्य, तरीही आंदोलन सुरूच
SHARES

पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयातील विद्यार्थी आणि डॉक्टरांना वसतीगृहात राहू न देण्याचा निर्णय अखेर रुग्णालय प्रशासनाने मागे घेतला आहे. मात्र तरीही, विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेऊन साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.


१३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन

गुरुवारी विद्यार्थ्यांनी मागण्यांविषयी आणि विद्यार्थ्यांवर केलेल्या आरोपांविरोधात अधिष्ठातांना फैलावर घेतलं. अधिष्ठातांनी मागण्यांचं आश्वासन देऊन कोणतीही ठोस उपाय योजना केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. गेले १३ दिवस हे विद्यार्थी आणि डॉक्टर आंदोलनाला बसले आहेत.


'अधिष्ठातांची हकालपट्टी करा'

गुरुवारी अधिष्ठातांची घेतलेल्या भेटीत तूर्तास वसतिगृहात शिकाऊ विद्यार्थ्यांना राहता येईल, मूलभूत सुविधा पुरविल्या जातील आणि परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत या मागण्यांच्या पूर्ततेचं लेखी आश्वासन देण्यात आलं. पण, 'अधिष्ठाता पदावरुन डॉ. खट्टी यांना काढून योग्य व्यक्तीची नेमणूक करावी' ही आग्रही मागणी राज्य शासनाने पूर्ण करावी, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

तर, शुक्रवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन हे रुग्णालयाची भेट घेणार असल्याचंही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यानुसार, आंदोलनाचा पुढचा टप्पा ठरेल, असंही सांगण्यात आलं आहे.


शिक्षकांचा विद्यार्थिनींवर दबाव

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थिनींना शिक्षकांनी कॉलेजच्या सभागृहात बोलावून घेतलं. तसंच, 'तुमच्या इतर मागण्या मान्य करु, तुम्ही अधिष्ठातांना पदावरुन हटवण्याची मागणी मागे घ्या' असा दबाव कॉलेजच्या विद्यार्थिनींवर टाकण्याचा प्रयत्न झाल्याचं आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींनी सांगितलं. पण, अधिष्ठातांच्या हकालपट्टीवर आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि डॉक्टर ठाम आहेत.



हेही वाचा

पोद्दार रुग्णालयाने काढलं शिकाऊ डाॅक्टरांना वसतिगृहाबाहेर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा