Advertisement

प्रवीण परदेशी 14 दिवसांच्या सुट्टीवर

पालिका आयुक्तपदावरून गच्छंती करण्यात आलेले प्रवीण परदेशी हे नगरविकास खात्याच्या अप्पर सचिवपदाचा पदभार घेताच रजेचा अर्ज टाकत सुट्टीवर गेले आहेत.

प्रवीण परदेशी 14 दिवसांच्या सुट्टीवर
SHARES

मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच इक्बालसिंह चहल यांनी तात्काळ कामाला सुरूवात केली आहे. मात्र,  पालिका आयुक्तपदावरून गच्छंती करण्यात आलेले प्रवीण परदेशी हे नगरविकास खात्याच्या अप्पर सचिवपदाचा पदभार घेताच रजेचा अर्ज टाकत सुट्टीवर गेले आहेत. परदेशी 14 दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत.

 गेल्या दीड महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा फैलाव सातत्याने होत आहे. कोरोना आटोक्यात आणण्यास प्रविण परदेशी यांना अपयश येत होते. या पार्श्वभूमीवर प्रवीण परदेशी यांची शुक्रवारी तातडीने नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव या पदावर केली. तर त्यांच्या जागी इक्बाल चहल यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली. आयुक्तपदावरून हटवल्याने परदेशी नाराज झाले असून त्यामुळे ते रजेवर गेल्याचे बोलले जात आहे. 

परदेशी यांची पत्नी विदेशातून मायदेशी परतणार आहेत. त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार असल्याने पत्नीच्या मदतीसाठी परदेशी हे रजेवर गेल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, कोरोन प्रतिबंध उपाययोजना करण्यासाठी गेले दोन महिने मी रात्रंदिवस काम करत होतो. या कालावधीत मला आजारी असलेल्या माझ्या वडिलांना वेळ देता आलेला नाही. त्यांना आता वेळ देता यावा यासाठी रजेचा अर्ज केला आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. हेही वाचा -

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मिठाचा वापर, मागणीत प्रचंड वाढ

१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा