Advertisement

लॉर्ड विजय करणार अवयवदानासाठी चेन्नई ते लडाख प्रवास


लॉर्ड विजय करणार अवयवदानासाठी चेन्नई ते लडाख प्रवास
SHARES

आपण अनेदका मौजमजेसाठी कुटुंबियांसोबत देश-विदेशाचे भ्रमण करतो. अनेकांना नोकरीसाठी आणि आपल्या वैयक्तिक कामानिमित्त परदेशात जावे लागते. पण, एक व्यक्ती अवयवदानाबद्दल जनजागृति करण्यासाठी चेन्नई ते लडाख हे अंतर पार करणार आहे.

पहिला टप्पा म्हणून अवयवदानासंदर्भात लोकांना जागरुक करण्यासाठी चेन्नई ते लडाख असा 9 हजार किमीचा प्रवास करण्याचं मी ठरवलं आहे. या आजाराबाबत भारतात अद्याप फार कमी जागरुकता आहे. अवयवदानाच्या संकल्पनेला अनेक लोकांचा विरोध आहे. अशा लोकांचे मतपरिवर्तन करणे, हेच माझे ध्येय आहे.

लॉर्ड विजय, नृत्य कलाकार

पेशाने नृत्य कलाकार असलेले लॉर्ड विजय हा प्रवास करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी दविता किडनी केअरच्या मदतीने ‘स्प्रेडिंग होप’ या संकल्पनेखाली जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. नानफा फाऊंडेशनच्या सहकार्याने चेन्नई ते लडाख असा तब्बल 9 हजार किमीचा प्रवास कारने पार करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.


कोण आहेत लॉर्ड विजय ?

लॉर्ड विजय हे एकेकाळी मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. 2016 मध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. एका मिनिटात सर्वाधित स्प्रिंग फ्लिप्स करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. एका मिनिटात 33 फ्लिप्सचा विक्रम मोडून काढत त्यांनी 39 फ्लिप्सचा नवा रेकॉर्ड तयार केला. त्याचीच दखल धेत विजय यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. 

आता त्यांनी अवयवदान किती महत्त्वाचे आहे? याविषयाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.

2013 सालात त्यांना मूत्रपिंड विकाराने ग्रासल्याचे निदान झाले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

दहापैकी एका भारतीयाला मूत्रपिंड विकाराचा धोका असतो, तर त्याच्या गांभीर्याबाबत जागरुकता केवळ 7 टक्के आहे. आशियामध्ये जवळजवळ 30 लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत. पण जनजागृतीचा अभाव आणि न परवडणारे उपचार, यामुळे फक्त 30 टक्के लोकांना उपचार मिळतात. जागरुकता वाढल्याने जीवनशैली आणि उपचारांमध्ये लवकर बदल घडवता येतात. त्यामुळे क्रॉनिक किडनीच्या आजारांचा (सीकेडी) धोका कमी होऊ शकतो किंवा सीकेडी असलेल्या लोकांमध्ये आजारवाढीचा धोका कमी होऊ शकतो.

डॉ. अविनाश इग्नेशियस, नेफ्रोलॉजिस्ट

शुक्रवारी केईएम रुग्णालयात 'स्प्रेडिंग होप' या संकल्पनेखाली मूत्रपिंड विकार आणि अवयवदानाबाबत जनजागृती संदर्भात एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. 10 लाख लोकांकडून अवयवदानाची प्रतिज्ञा वदवून घेणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे. या ध्येयासाठी सरकार, कॉर्पोरेट्स, शैक्षणिक आणि आरोग्य संस्था आदींना मोहिमेत सहभागी करून घेण्याचा मुख्य उद्देश असल्याचे लॉर्ड विजय यांनी सांगितले.

मूत्रपिंड विकाराबाबत भारतात जनजागृती खूप कमी आहे. मूत्रपिंड विकाराचे सुरुवातीलाच निदान होणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून एंड स्टेज रेनल डिसीजची वाढ रोखता येईल. याच दृष्टीकोनातून स्प्रेडिंग होप मोहिमेअंतर्गत आम्ही जागरुकता वाढवण्यास मदत करत आहोत.

आदित्य सिंग, व्यवस्थापकीय संचालक, दविता केअर इंडिया प्रा. लिमिटेड

यासाठी विविध शहरांमध्ये काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.



हेही वाचा - 

मृत्यूनंतरही 'त्या'ने वाचवले 6 जीव!

तुमच्या चिमुकल्यालाही ह्रदयरोग होऊ शकतो!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा