Advertisement

राजावाडी रुग्णालयातील डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा अखेर मृत्यू

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या राजावाडी रुग्णालयातील (Rajawadi Hospital) डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा अखेर मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

राजावाडी रुग्णालयातील डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा अखेर मृत्यू
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या राजावाडी रुग्णालयातील (Rajawadi Hospital) डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा अखेर मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या रुग्णाचे डोळे उंदरानं कुरतडल्याची माहिती मंगळवारी सोमवारी समोर आली होती. या रुग्णाचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तीन दिवसांपूर्वी श्रीनिवास यल्लपा नावाच्या रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीनिवास यांचे डोळे चक्क उंदरानं कुरतडल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान या रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आलेलं नाहीये. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट होईल.

याप्रकरणानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या सर्व गोष्टीची खातरजमा करत होतो तेव्हा लक्षात आलं की, हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे याची खबरदारी घेतलेली आहे. पण तळाला असल्याने आणि पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा. रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्याने निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्यानं लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली.

महापौरांनी पुढे म्हटलं, आयसीयू वॉर्ड असल्यानं तळ मजल्यावरच असायला हवा कारण रुग्णाला नेण्यासाठी बरं पडतं. इतकी खबरदारी घेतली असतानाही उंदीर आतमध्ये जातात. ही संपूर्ण घटना गंभीर आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान आपनं शीव रुग्णालयाबाहेर याप्रकरणी आंदोलन केलं.  महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर यावेळी आरोप करण्यात आले. आपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाची डागडुजी करण्यात निष्काळजीपणा केला. त्यामुळे अशी घटना घडली. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी चेहऱ्यावर उंदराच्या चेहऱ्याचे मास्क घातले होते. 

योगायोगाने, गेल्या चार वर्षांत वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे. शीव रुग्णालयात घडलेली ही पहिली घटना नाही. २०१७ मध्ये एका उंदरानं रुग्णाच्या पायाला कुरतडलं होतं. तर एप्रिल २०१८ मध्ये आणखी एक घटना समोर आली होती, जेव्हा जोगेश्वरी इथल्या एका रुग्णालयातील रुग्णानं उजवा डोळा कुरतडल्याचा आरोप केला होता. मात्र, रुग्णालयातील अधिका्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.



हेही वाचा

दिलासादायक! राज्यात 'डेल्टा प्लस'चे २ रूग्ण पूर्णपणे बरे

Corona Vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा