Advertisement

म्हाडाचा आणखी एक अधिकारी निलंबित, जमीन वितरणातील अनियमितता भोवली?


म्हाडाचा आणखी एक अधिकारी निलंबित, जमीन वितरणातील अनियमितता भोवली?
SHARES

गोरेगावच्या सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाच्या कामाचा चुकीचा अहवाल सादर करत राज्य सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी म्हाडाच्या मुंबई मंडळातील कार्यकारी अभियंत्याचं निलंबन होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच म्हाडातील आणखी एका अधिकाऱ्याचे निलंबन सोमवारी करण्यात आल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आठवड्याभरात दोन अधिकाऱ्यांचं निलंबन झाल्याने म्हाडातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. त्याचवेळी पत्राचाळ प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून यापुढेही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मालिका अशीच सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


कोण आहे हा कर्मचारी?

सध्या म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले के. डी. सुरवाडे या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. हा अधिकारी सध्या दुरूस्ती मंडळात कार्यरत असला तरी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी या अधिकाऱ्याचं निलंबन मुंबई मंडळातील प्रकरणामध्ये केल्याचं समजत आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव पुढं येत असून या अधिकाऱ्याच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार असल्याची चर्चा म्हाडात सुरू आहे. हा अधिकारीही दुरुस्ती मंडळातील असल्याचं समजतं


कुठल्या प्रकरणांत निलंबन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २००५ मधील जमीन वितरणाच्या प्रकरणात हे निलंबन करण्यात आलं आहे. जमीन वितरणामध्ये अनियमितता आढळल्याने, नियमांचा भंग केल्याचं निर्दशनास आल्याने तसेच लोकलेखा समितीनेही या प्रकरणी ताशेरे ओढल्याने या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन झाल्याची चर्चा आहे. मात्र यासंबंधीची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.हेही वाचा-

दोन दिवसांत अहवाल सादर करा! पत्राचाळ सोसायटीलाही म्हाडाचा दणका

'मुंबई लाइव्ह' इम्पॅक्ट: हो, शिवाजी पार्कच्या 'त्या’घराचं वितरण जाहिरातीविनाच! म्हाडाची कबुली

घोटाळ्यातले 'मास्टर'! म्हाडाने जाहिरात न देताच केलं शिवाजी पार्कच्या घराचं वितरण?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा