म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 819 घरांच्या लाॅटरीसाठी शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून आॅनलाईन नोंदणीस सुरूवात झाली आहे. त्यानुसार दुपारी दोन ते संध्याकाळी 7 या पाच तासांत 1800 इच्छुकांनी लाॅटरीत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. हा प्रतिसाद चांगला असल्याचा दावा मुंबई मंडळाकडून केला जात आहे.
मात्र यंदा म्हाडाची घरे खूपच महाग असून म्हाडाचा मुख्य ग्राहक अत्यल्प गटच लाॅटरीतून हद्दपार असल्याने लाॅटरीला प्रतिसाद मिळणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रतिसाद मिळणार कि नाही हे अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होईल.
म्हाडाच्या लाॅटरीद्वारे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुकांना अर्ज भरावा लागतो. पण हा अर्ज भरण्यासाठी आधी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे असते. कारण नोंदणी करणाऱ्यांच पुढे अर्ज भरावा लागतो. त्यामुळे नोंदणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानुसार 16 सप्टेंबर 21 आॅक्टोबरदरम्यान नोंदणी करता येणार आहे.
लाॅटरीसाठी शनिवारी, 16 सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून रविवारी, 17 सप्टेंबरला दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 22 आॅक्टोबरपर्यंत इच्छुकां (नोंदणी केलेल्या) ना अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज सादर करत लाॅटरीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे.
आतापर्यंत म्हाडाच्या घराने 90 लाखांचाही आकडा पार केला नव्हता. तिथे यंदा मात्र म्हाडाची घरे कोटीच्या कोटी उड्डाणरे घेत आहेत. लोअर परळमधील उच्च उत्पन्न गटातील दोन घरे 1 कोटी 95 लाखांची असून 34 घरे 1 कोटी 42 लाखांची आहेत. तर तुंगा पवईतील उच्च उत्पन्न गटातील 168 घरे 1 कोटी 40 लाख अशी आहे. त्यानुसार यंदा एक दोन नव्हे तर तब्बल 204 घरांनी कोटीचा आकडा पार केला आहे. या घरांसाठी किती अर्ज सादर होणार हा वेगळा मुद्दा असला तरी या घरांच्या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत यंदा मोठी भर पडणार हे नक्की.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)