Advertisement

कोस्टल रोडमध्ये होणार देशातील सर्वात मोठा जमिनीखालील बोगदा

कोस्टल रोडवर २.०८२ किलोमीटरचे दोन बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चायना मेड टीबीएम वापरलं जाणार आहे. या मशीनला `मावळा’ असं नाव देण्यात आलं आहे.

कोस्टल रोडमध्ये होणार देशातील सर्वात मोठा जमिनीखालील बोगदा
SHARES

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडमध्ये देशातील सर्वात मोठा जमिनीखालील बोगदा होणार आहे. कोस्टल रोडच्या जमिनीखालील बोगद्याचे काम जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. १८  महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.  

कोस्टल रोडवर २.०८२ किलोमीटरचे दोन बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चायना मेड टीबीएम वापरलं जाणार आहे. या मशीनला `मावळा’ असं  नाव देण्यात आलं आहे. या मशीनचा व्यास १२.१९ मीटर आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यास असलेली ही मशीन आहे.  कोस्टल रोडचे आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर डिसेंबर २०२१ पर्यत ५५ टक्के, डिसेंबर २०२२ पर्यत ८५ टक्के व जुलै २०२३ पर्यत १०० टक्के काम पूर्ण होणार आहे. 

जमिनीखालील बोगद्यात एकूण 6 लेन असणार आहेत. हा बोगदा विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात येत असून बोगद्यात काही दुर्घटना घडल्यास पालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल, पोलीस व वाहतूक पोलीस या यंत्रणांना तात्काळ मेसेज जाणार असून तातडीने मदत करणे शक्य होणार आहे. 

मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सिलिंक असा १०.५८ किलोमीटरचा हा कोस्टल रोड बांधला जाणार आहे. वरळी सी-लिंकपासून पुढे कांदिवलीपर्यंत हा रस्ता जाणार आहे.



हेही वाचा -

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात

कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा