Advertisement

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यास २ दिवस मुदतवाढ


म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यास २ दिवस मुदतवाढ
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 819 घरांसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला महिन्याभरात थंड प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने ग्राहकांचा आकडा फुगवण्यासाठी का होईना; पण नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 10 नोव्हेंबरला 819 घरांसाठी  लाॅटरी फुटणार आहे. या लाॅटरीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. 16 आॅक्टोबरला या प्रक्रियेला एक महिना पूर्ण झाला असून महिन्याभरात या प्रक्रियेला थंड प्रतिसाद मिळाला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार नोंदणीचा आकडा बुधवारी दुपारी दीड वाजेपर्यंत 51 हजार 777, तर अर्जाचा आकाड 52 हजार 038 असा असून प्रत्यक्षात अनामत रकमेसह 26 हजार 233 अर्ज सादर झाले आहेत. 

गेल्या वर्षी 912 घरांसाठी 2 लाख नोंदणी आणि अनामत रकमेसह 1 लाख 36 हजार अर्ज सादर झाले होते. पण यंदा नोंदणी आणि अर्जाचा आकडा 1 लाख तरी पार करेल का? याबाबत साशंकता आहे. म्हाडाच्या महागड्या घरांकडे इच्छुकांना पाठ फिरवली आहे. या धर्तीवर आता अर्जाचा आकडा फुगवण्यासाठी मुंबई मंडळाने नोंदणी, अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती या तिन्ही प्रक्रियेसाठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या दोन दिवसांच्या मुदतवाढीत आकडा किती फुगतो, अर्जांचा आकडा 1 लाखांचा पल्ला पार करतो हा? हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.


नवीन तारखा अशा:

नोंदणी 21 आॅक्टोबरला रात्री 11. 59 वाजता बंद होणार होती. आता नोंदणी 23 आॅक्टोबरला रात्री 11.59 मिनिटांनी बंद होईल.

नोंदणीधारकांना 22 आॅक्टोबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार होता. आता 24 आॅक्टोबर रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज भरता येतील.

आॅनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख 22 आॅक्टोबरएेवजी 24 आॅक्टोबर अशी असेल.

आरटीजीएस-एनएफईटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्यासाठी 24 आॅक्टोबरऐवजी २६ आॅक्टोबर अशी मुदत असेल.

आॅनलाईन पेमेन्टद्वारे 24 एेवजी 26 आॅक्टोबरपर्यंत अर्ज सादर करता येतील.



हेही वाचा -

700 म्हाडा विजेते अजूनही घराच्या प्रतिक्षेत, ओसीचा खोडा

बीकेसीत बुलेट ट्रेन आणि आयएफएससी सेंटरही?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा