मेट्रो-३ : ५६७ मीटरचा बोगदा खोदून दुसरं टीबीएम बाहेर

१० नोव्हेंबर २०१७ ला पहिलं टीबीएम मशिन माहीम इथल्या विहिरीत सोडण्यात आलं. त्यानंतर एक-एक करत सर्व मशीन मुंबईच्या पोटात सोडण्यात आल्या अाहेत. या टीबीएम मशीन बोगदे खोदण्याचं काम करत असून आतापर्यंत ५२ पैकी अंदाजे १३ किमी बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे.

  • मेट्रो-३ : ५६७ मीटरचा बोगदा खोदून दुसरं टीबीएम बाहेर
  • मेट्रो-३ : ५६७ मीटरचा बोगदा खोदून दुसरं टीबीएम बाहेर
SHARE

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ प्रकल्पाच्यादृष्टीने बुधवारचा, २६ डिसेंबरचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण या दिवशी मेट्रो-३ प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडले. सिप्झ येथील मेट्रो-३ च्या साईट इथं दुसऱ्या टीबीएम (टनेल बोरिंग मशिन) चं ब्रेक थ्रू यशस्वीपणे पार पडलं.  दुसरं टीबीएम मशिन सारीपुत ते सिप्झ ५६७ मीटरचा बोगदा खोदून सकाळी दहाच्या सुमारास बाहेर पडलं. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) आणि मुंबईकराच्यादृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. 
१३ किमी बोगदा पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सिप्झ या ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गासाठी अत्याधुनिक अशा टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार टीबीएम ३३.५ किमी मार्गातील ७ ठिकाणच्या (साईट) २५ ते ३० मीटर खोल विहिरीत सोडण्यात आल्या आहेत. या १७ टीबीएम मशिन ५२ किमीचा बोगदा खोदण्याचं काम करणार आहेत. १० नोव्हेंबर २०१७ ला  पहिलं टीबीएम मशिन माहीम इथल्या विहिरीत सोडण्यात आलं. त्यानंतर एक-एक करत सर्व मशीन मुंबईच्या पोटात सोडण्यात आल्या अाहेत.  या टीबीएम मशीन बोगदे खोदण्याचं काम करत असून आतापर्यंत ५२ पैकी अंदाजे १७ किमी बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे.


सारीपुत ते सिप्झ बोगदा

मरोळ मेट्रो स्थानकातील वैनगंगा हे टीबीएम मशिन तीन महिन्यांपूर्वी, २४ सप्टेंबर २०१८ ला पाली मैदान ते विमानतळ असा १.२६ किमीचा बोगदा खोदून आंतरराष्ट्रीय विमानतळ इथल्या साईटवरून बाहेर पडलं होतं. पहिल्यांदाच एक अवाढव्य मशिन मुंबईच्या पोटात शिरून बोगदा खोदून बाहेर पडणार होतं. त्यामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्यावेळी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या क्षणाचे साक्षीदार होते. आता सारीपुत ते सिप्झ असं ५६७ मीटरच्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण करत बुधवारी, २६ डिसेंबरला सकाळी दहा वाजता सिप्झ साईटवरून बाहेर पडलं आहे.


२०१९ पर्यंत काम पूर्ण

आतार्यंत १७ किमीच्या बोगद्याचं काम पूर्ण झालं असलं तरी अजून एमएमआरसीसमोर ३९ किमीच्या बोगद्याच्या खोदकामाचं मोठं आव्हान आहे. हे आव्हान टीबीएम मशिनच्या माध्यमातून एमएमआरसी पेलत आहे. बोगद्याच्या कामाला वेग दिला असून डिसेंबर २०१९ पर्यंत सर्वच्या सर्व १७ टीबीएम मशीन ५२ किमीचा बोगदा खोदून मुंबईच्या पोटातून बाहेर पडतील अशी माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=_g4MGp1qcIg


हेही वाचा - 

खूशखबर! एसी लोकलच्या तिकीट दरवाढीला स्थगिती

मुंबईकरांसाठी नववर्षाची भेट! मुंबई ते नवी मुंबई प्रवास करा वाॅटर टॅक्सीने
संबंधित विषय
ताज्या बातम्या