Advertisement

'या' २ ठिकाणी कायमस्वरुपी सायकल मार्गिकेचा प्रस्ताव

‘सायकल चला, सिटी बचा’ या अभियानाअंतर्गत दोन कायमस्वरूपी सायकल लेन उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

'या' २ ठिकाणी कायमस्वरुपी सायकल मार्गिकेचा प्रस्ताव
SHARES

‘सायकल चला, सिटी बचा’ या अभियानाअंतर्गत दोन कायमस्वरूपी सायकल लेन उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काही सायकल पट्टूंनी मालाडमधील माइंडस्पेस इथं एक लेन आणि दुसरी वरळीच्या जांबोरी मैदानातील गल्लीत लेन बनवण्यात यावी, असा प्रस्ताव दिला आहे.

मुंबईतल्या प्रत्येक प्रभागातील एकूण २४ दुचाकी समोपदेशकांनी शहरातील १ हजार २०० सायकल स्टँडची पाहणी केली आहे. याशिवाय दरमहा शहरात कार फ्री डे साजरा करण्यास भर द्यावा, असाही सल्ला देत आहेत. हे दोन्ही प्रस्ताव महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती आहे.

“आम्ही मुंबईत दोन ठिकाणी बाईक लेनबद्दल गंभीर आहोत. सायकलच्या प्रत्येक स्टँडवर ५ सायकल उभ्या करण्यात येतील. आम्ही प्रत्येक ठिकाणी दोन युनिट्सची मागणी केली आहे. म्हणजे एका ठिकाणी १० सायकल उभ्या असतील,” असं फिरोजा सुरेश म्हणाले.

सायकल चालवणा-या उत्साही लोकांनी उपरोक्त सायकल स्टँडसाठी एक नवीन डिझाईन चार्ट केलं आहे. याशिवाय मुंबई महापौर मुंबईच्या सायकलिंग नकाशावर काम करत आहेत, जे लवकरच मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

"आम्हाला योग्य पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. ज्यामुळे अधिक साकलस्वार रस्त्यावर येण्यास प्रोत्साहित होतील," असंही फिरोजा बोलल्या.



हेही वाचा

अंध रेल्वे प्रवाशांना जागा ओळखणं होणार सोपं

सुट्टी, वीकेंडला पूर्ण दिवस लोकल प्रवासाची मुभा द्या; रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा