Advertisement

शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूसाठी १० कंपन्या स्पर्धेत


शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूसाठी १० कंपन्या स्पर्धेत
SHARES

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामासाठी तब्बल १७ कंपन्यांनी उत्सुकता दाखवली होती. या कंपन्यांच्या निविदांची छाननी करत अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने १० कंपन्या पात्र ठरवल्या आहेत. त्यामुळे आता 'एमटीएचएल'च्या बांधकामासाठीच्या निविदेच्या स्पर्धेत १० कंपन्या असणार असून लवकरच निविदा अंतिम करत बांधकामाचे कंत्राट 'एमएमआरडीए'कडून बहाल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत कोणती कंपनी बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

तीन टप्प्यांसाठी १७ कंपन्यांकडून निविदा सादर

१७ पैकी १० कंपन्या पात्र

पहिल्या दोन टप्प्यांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ४ कंपन्या पात्र

तर तीसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी दोन कंपन्या स्पर्धेत


पहिल्या १०.३८ किमीच्या टप्प्यासाठी ४ कंपन्या अशा

  • मे. देवू इंजिनिअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कं. लि. आणि मे. टाटा प्रोजेक्टस लि.
  • मे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कं. लि. आणि मे. एस. के. इंजिनिअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कं. लि.
  • मे. आयटीडी सिमेंटेशन इंडिया लि., मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर्स लि., मे. इटालियन थाय डेव्हल्पमेन्ट पब्लिक कं. लि. आणि मे. सुमितोमो मित्सुई कन्स्ट्रक्शन कं. लि.
  • मे. लार्सन अॅण्ड टुब्रो लि. इंडिया आणि मे. आयएचआय इन्फ्रास्टक्चर सिस्टिम  कं.


दुसऱ्या टप्प्यातील, ७.८०७ किमीच्या टप्प्यासाठीच्या पात्र निविदा 

  • मे. देवू इंजिनिअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कं. लि. आणि मे. टाटा प्रोजेक्टस लि.
  • मे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कं. लि. आणि मे. एसके इंजिनिअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कं. लि.
  • मे. आयटीडी सिमेंटेशन इंडिया लि., मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर्स लि., मे. इटालियन थाय डेव्हल्पमेन्ट पब्लिक कं. लि. आणि मे. सुमितोमो मित्सुई कन्स्ट्रक्शन कं. लि.
  • मे. लार्सन अॅण्ड टुब्रो लि. इंडिया आणि मे. आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम्स


३.६१३ किमीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या निविदा 

  • 1) मे. आयटीडी सिमेंटेशन इंडिया लि., मे. ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टस लि. आणि मे. म्हात्रे इन्फ्रा प्रा. लि.
  • 2) मे. लार्सन अॅण्ड टुब्रो लि.


हे ही वाचा 

मेट्रो-7चे काम संथगतीने; एमएमआरडीएची कंत्राटदारांना तंबी

बीकेसीत बुलेट ट्रेन आणि आयएफएससी सेंटरही?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा