सिडकोचा दिवाळी धमाका, 20 भुखंडांची विक्री!


SHARE

सरकारी कर्मचारी आणि पोलिस मोठ्या संख्येने निवासस्थानात राहत असून या निवासस्थानांची दुरवस्था सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात सरकारी कर्मचारी असो वा पोलिस, मुंबई वा आसपासच्या परिरसरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यात पत्रकारांची अवस्था तर अत्यंत बिकट. त्यामुळे सरकारी कर्मचारी, पोलिस, कलाकार, पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहत आहे.

आता मात्र अनेक सरकारी कर्मचारी, पोलिस, कलाकार, लोकप्रतिनिधी, खेळाडू, आरक्षित गट (एससी-एसटी, व्हीजी-एनटी-नवबौद्ध), स्वातंत्र्य सैनिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण, सिडकोने नवी मुंबई परिसरातील तब्बल 20 भूखंड विक्रीसाठी काढले असून या भुखंडांची खरेदी विविध गटातील लोकांना सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून करता येणार आहे. त्यानुसार गुरूवारी, 5 ऑक्टोबरपासून या भूखंड विक्रीच्या माहिती पुस्तिकेच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. तर 9 ऑक्टोबरपासून अर्जविक्रीस सुरूवात होणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सिडकोकडून पहिल्यांदाच अशी भूखंड विक्री होत असून लवकरच मुंबईप्रमाणे नवी मुंबईत पत्रकार कॉलनी, साहित्य सहवास, कलानगर अशी नावे दिसली, तर आश्चर्य वाटायला नको.

ठिकाण सेक्टर
प्लॉट क्र.
क्षेत्रफळ (चौ. मी.)
बेस किंमती
अनामत रक्कम
गट
पनवेल 5 ए (ई)
47
1142.00
37,454
42, 87,700
स्वातंत्र्य सैनिक
नेरूळ  58 ए  
11
3890.00
43,890
1,70,73,300
सरकारी कर्मचारी-प्रथम श्रेणी
नेरूळ  40
39-40
1342.00
39,900
53, 54,600
सरकारी कर्मचारी-द्वितिय श्रेणी
खारघर 20
29
1475.00
27,960
41, 24,100
सरकारी कर्मचारी-तृतीय श्रेणी
पनवेल 13 (ई)
24
2105.00
25,830
54,37,300
सरकारी कर्मचारी-चतुर्थ श्रेणी
पनवेल 5 ए (ई)
6
1200.00
25,830
30, 99,600
केंद्र सरकारी कर्मचारी
पनवेल 8 (ई)
12,126,127
1008.00
25,830
26,03,700
अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती
कळंबोली 11
6बी-1
1499.00
24,582
36,84,900
व्हीजी, एनटी, नवबौद्ध
पनवेल 8 (डब्ल्यू)
13
2468.00
25,830
63,74,900
पत्रकार-कलाकार
नेरूळ  38
12
938.00
39,900
37,42,700
खेळाडू
खारघर 12
6
2200.00
27,960
61,51,200
लोकप्रतिनिधी
कळंबोली 6 ई
8
1000.00
19,665
19,66,500
खुला प्रवर्ग
कळंबोली 6 ई
9
954.00
19,665
18,76,100
खुला प्रवर्ग
कळंबोली 11
6 बी
1150.11
19,665
22,61,700
खुला प्रवर्ग
खारघर 20
34
1475.00
27,960
41,24,100
खुला प्रवर्ग
खारघर 19
257 ते 260
1544.00
27,960
43,17,100
खुला प्रवर्ग
पनवेल 8 (ई)
112,118,124,117,124
1808.00
32,288
58,38,200
खुला प्रवर्ग
सानपाडा 24
37सी-37 डी
940.00
48,488
45,57,900
खुला प्रवर्ग
सानपाडा 24
35ए-35बी
800
48,488
38,79,100
खुला प्रवर्ग
घनसोली 6
62
2165.00
23,670
51,24,600
सरकारसाठी आरक्षित


इथे मिळेल माहिती पुस्तिका

5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर - सकाळी 11 ते दुपारी 1

मार्केटिंग मॅनेजर - 1चे कार्यालय, सिडको, तिसरा माळा, रायगड भवन, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई - 400614


अर्जविक्री

9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर - सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5

हे भूखंड निवासी बांधकामासाठी आरक्षित असून सरकारी कर्मचारी, पोलिस, पत्रकार, कलाकार, खेडाळू आणि इतर आरक्षित गटातील लोकांनी एकत्र येत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करत या भूखंडांवर घरे बांधणे अपेक्षित आहे. दरम्यान, ज्याप्रमाणे अर्ज येतील, त्याप्रमाणे अर्जांची छाननी करत सिडकोकडून पात्र अर्ज दाखल करून घेतले जातील. तर एकापेक्षा अधिक पात्र अर्ज असल्यास लॉटरी पद्धतीने भुखंडांची विक्री होण्याची शक्यता आहे.हेही वाचा

अखेर म्हाडाच्या लॉटरीतील दलाली आणि भ्रष्टाचाराला लगाम!


संबंधित विषय