Advertisement

'एसआरए'चा कारभार आता डिजीटल, भ्रष्टाचाराला बसणार चाप


'एसआरए'चा कारभार आता डिजीटल, भ्रष्टाचाराला बसणार चाप
SHARES

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण, अशीच ओळख गेल्या काही वर्षांत 'एसआरए'ची झाली आहे. त्यातच 'एसआरए'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त होताना ज्या १३७ 'एसआरए' प्रकरणाच्या फाईल्स मंजूर केल्या, त्यात गडबड केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी त्यांची चौकशीही लावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे 'एसआरए'तील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याची जोरदार चर्चा आहे.

या ठपक्यानंतर जाग आलेल्या 'एसआरए' प्राधिकरणाने आता कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सर्व कारभार आॅनलाईन अर्थात डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून लवकरच डिजीटल कारभाराच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात होईल, अशी माहिती 'एसआरए'चे मुख्य अधिकारी दिपक कपूर यांनी दिली.

मानवी हस्तक्षेप टाळत प्रकरणे वेळेत आणि जलद गतीने मार्गी लागावीत यासाठी 'एसआरए'ने अाॅटोमेशन संगणकीय प्रणाली विकसीत करण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे 'नेट क्रिएटीव्ह माईंड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला अाॅटोमेशन संगणकीय प्रणाली विकसीत करत ती कार्यान्वित करण्याचे काम देण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांतच हे काम पूर्ण करत प्रत्यक्षात ही संगणकीय प्रणाली लागू होईल आणि 'एसआरए'चा कारभार डिजीटल होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


चिरीमिरीलाही चाप

झोपुच्या भ्रष्ट कारभारामुळे झोपडपट्टीधारक, सहकारी सोसायट्या चांगल्या त्रस्त झाल्या आहेत. या त्रस्त झोपडपट्टीधारकांनाही 'एसआरए'च्या डिजीटल कारभारामुळे दिलासा मिळणार आहे. कुठल्याही प्रस्तावाची, प्रकल्पाची सद्यस्थिती संबंधित झोपडीधारकाला आॅनलाईन समजणार असल्याने त्यांना 'एसआरए'च्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत वा चिरीमिरी देत कामेही करून घ्यावी लागणार नाही. 

झोपडीधारकांच्या घराच्या चावी वाटपाची पद्धतही आॅनलाईन केली जाणार असल्याने चावी वाटपातही पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे 'एसआरए'च्या निर्णयाचे स्वागत होत असून आता ही प्रणाली योग्य पद्धतीने राबवण्याची मागणी होत आहे.




हेही वाचा -

एसआरए घोटाळ्याप्रकरणी येवले यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा