मतदान करा, 10 टक्के सूट मिळवा!

 Mumbai
मतदान करा, 10 टक्के सूट मिळवा!

मुंबई - लोकशाहीला बळकटी द्यायची असेल तर प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. यासाठीच आता लोअर परेलच्या स्टेटस हॉटेलने एक अनोखी शक्कल लढवली आहे. 21 फेब्रुवारीला मतदान केल्याचं दाखवा आणि खाद्यपदार्थावर 10 टक्के सूट मिळवा अशी अनोखी योजना या हॉटेलच्या मालकाने राबवली आहे. मतदाराने सुट्टीचा उपयोग केवळ मतदानासाठी करावा, तसेच मतदाराला मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे हॉटेल मालक रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.

Loading Comments