रंगपंचमी खेळण्यापूर्वी अशी घ्या केसांची आणि त्वचेची काळजी

त्वचेवरून रंग हटविल्यानंतरही पुढे किती तरी वेळ त्वचेची आग होणे, त्वचेवर लाली येणे असे प्रकार सुरू राहतात. हे सर्व टाळण्यासाठी रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळून झाल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

रंगपंचमी खेळण्यापूर्वी अशी घ्या केसांची आणि त्वचेची काळजी
SHARES

होळी आणि रंगपंचमी आनंदानं, उत्साहानं भरलेले आणि रंगांनी नटलेले सण आहेत. मात्र हे रंग आपली त्वचा आणि केस यांच्याकरिता नुकसानकारक ठरू शकतात. रंग खेळण्यापूर्वी चमकदार असलेले केस रंग खेळल्यानंतर अतिशय राठ, कोरडे दिसू लागतात. आपली त्वचा देखील कोरडी पडते, क्वचित प्रसंगी त्वचेची आग होऊ लागते. त्वचेवरून रंग हटविल्यानंतरही पुढे किती तरी वेळ त्वचेची आग होणे, त्वचेवर लाली येणे असे प्रकार सुरू राहतात. हे सर्व टाळण्यासाठी रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळून झाल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

१) रंग खेळण्यापूर्वी आपल्या त्वचेवर सनस्क्रीनचा वापर जरूर करावा. त्यामुळे घराबाहेर उन्हामध्ये रंग खेळताना त्वचा सुरक्षित राहील.

२) सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचेवर भरपूर कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेल लावावे. त्यामुळे रंग खेळल्यानंतर त्वचेला येणारा कोरडेपणा येणार नाही, आणि त्वचेवरून रंग सहज उतरेल.

३) होळीचे रंग खेळण्याच्या आधी कोणत्याही प्रकारची ब्युटी ट्रीटमेंट घेणं टाळावं.

४) तुम्ही कोरड्या रंगांऐवजी ओल्या रंगांचा वापर केला असेल, तर गरम पाण्यानं स्नान करणं टाळून, स्नान करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. स्नानासाठी थंड पाण्याचा वापर केल्यानं रंग त्वचेवरून लवकर उतरतात.

५) स्नान करताना त्वचेसाठी सौम्य साबण वापरावा आणि त्यानंतर बेसन आणि दह्याच्या मिश्रणाचा वापर करावा.

६) अनेक लोक त्वचेवरील रंग उतरविण्यासाठी केरोसीन, कपड्यांचा साबण असल्या वस्तूंचा वापर करतात, या वस्तूंचा वापर तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो

७) सण झाल्यानंतर त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी चांगल्या प्रतीच्या मॉईश्चरायझरचा किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा.

८) जर केस लांब असतील तर केस व्यवथित बांधून घ्यावेत. केसांनाही भरपूर तेल लावावे, म्हणजे त्यातून रंग निघून जाण्यास अडचण होणार नाही

९) रंग खेळताना शक्यतो एखाद्या दुपट्ट्यानं केस झाकावेत. विशेषतः केस कलर केलेले असतील. तर रंग खेळताना केस झाकणं उत्तम.

१०) रंग खेळून झाल्यानंतर जितके कोरडे रंग आपल्या हात-पायांवर किंवा केसांमध्ये असतील, ते झटकून टाकावेत. त्याआधी अंगावर किंवा केसांवर पाणी ओतून घेऊ नये. पाण्यामुळे रंग अजून पसरतील आणि मग सहजी साफ होणार नाहीत

११) रंग खेळून झाल्यानंतर केस एखाद्या चांगल्या प्रतीच्या सौम्य शँपूनं धुवावेत आणि त्यानंतर कंडीशनरचा वापर जरूर करावा. त्यामुळे केस कोरडे होणार नाहीत.
संबंधित विषय