Advertisement

उन्हाळ्यात हे '५' पदार्थ देतील गारवा


उन्हाळ्यात हे '५' पदार्थ देतील गारवा
SHARES

उन्हाळ्यात जीव नकोसा होता. उन्हामुळे अंगाची अक्षरश: काहिली होते. अशा वातावरणातच शरीराला थंड ठेवण्यासाठी मग आईस्क्रिम, थंडपेय यांचा आधार घेतला जातो. पण आईस्क्रिम आणि शितपेये तुम्हाला तात्पुरता दिलासा देतात. मात्र उन्हाळ्यात अशा पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे ज्यामुळे तुम्हाला गारवा जाणवेल आणि आजारांपासून देखील दूर राहाल. आम्ही तुम्हाला अशाच काही पाच पदार्थांची नावं सांगणार आहोत ज्याच्या सेवनानं तुम्हाला गारवा जाणवेल.

गुलकंद

गुलकंद तसा चवीला गोड आणि खायला स्वादिष्ट असतो. थंड दुधात किंवा थेट गुलकंदाचे सेवन आवर्जुन करावे. एक दिवस सोडून याचे सेवन करणं चांगलं. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पचनाचे विकार कमी होतात.

जिऱ्याचे पाणी

रात्रभर एका ग्लासात चमचाभर जिरे भिजत घालून त्या पाण्याचे अनशापोटी सेवन करावे. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. हे पाणी प्यायल्यावर जिरे चावून खावेत.


सब्जा आणि तुळशीचे बी

सब्जा आणि तुळशीचे बी यापैकी काहीतरी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सेवन करावे. उन्हाळीचा त्रास असलेल्यांनी तर तासाला असे पाणी प्यावे.

ताक

ताकाला अमृताची उपमा देण्यात आली आहे. ताकात काळे मीठ आणि हिंग घालावे. दिवसातून दोन ते तीन वेळी ताक प्यायल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो.

कोथिंबीर

कोथिंबीर ही थंड असते. त्यामुळे कोथिंबीर वाटून केलेला रस हा उष्णतेचा विकार आणि पित्तावर गुणकारी आहे. अगदी रस नाही तरी जेवणात कोथिंबीरचा वापर अधिक करावा.


हेही वाचा

उन्हाळ्यात थंडगार, रसदार कलिंगड खाण्याचे १२ फायदे

उन्हाळ्यात अंगाला खाज उठते? या ७ घरगुती उपायांनी करा समस्या दूर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा