Advertisement

2016 - मुंबईतील प्रमुख पाच बदल


2016 - मुंबईतील प्रमुख पाच बदल
SHARES

2016 या वर्षा मध्ये मुंबईत अशा काही घटना घडल्या, ज्यांचा मुंबईकरांना त्रास झाला आणि फायदाही... पाहूया अशा प्रमुख पाच घटना

1) स्वच्छता अभियानामुळे प्रेरणा घेत होत अनेकांनी रेल्वे रुळांवर शौचास बसणं बंद केलं. मुंबईतील काही भागांतल्या झोपडीपट्ट्याही स्वच्छ करण्यात आल्या. अभिनेता सलमान खानला महापालिकेनं स्वच्छेतेसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसेडर नेमण्यात आलं.
2) रेल्वे स्टेशनांचा कायापालट - या वर्षात अनेक स्टेशनांचा कायापालट करण्यात आला. स्टेशनच्या काही भागांत नेहमी पानाच्या पिचकाऱ्या असायच्या. तिथे रंगरंगोटी करण्यात आली, चित्रं काढण्यात आली. हमारा स्टेशन,हमारी शान कॅम्पेनच्या माध्यमातून वेस्टर्न रेल्वेच्या 21 आणि सेंट्रल रेल्वेच्या 15 स्टेशनांवर रंगरंगोटी करण्यात आली.
3) नोटबंदी - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयानं मोठ्या नोटा अचानक चलनातून बाद झाल्या. संपूर्ण देशासह मुंबईतही एटीएम आणि बँकांच्या बाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र दिसलं.
4) हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश - 2016 मध्ये महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळालं आणि महिलांनाही हाजी अली दर्ग्यात मझारपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
5) धोबीघाट - लवकरच धोबीघाट इतिहास जमा होणार आहे. धोबीघाटाचा सरकार विकास करणार आहे. इथे काम करणाऱ्यांसाठी बहुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. ज्यामध्ये कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठीही व्यवस्था असेल.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - 

https://www.youtube.com/watch?v=8y4jvb-9Ado&t=1s

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा