डिमांडमध्ये 500, 1000 रुपयांच्या नोटांचं पाकीट

दादर - १०००, ५०० रुपयांच्या नोटांवर मोदी सरकारनं बंदी घातल्यानं या नोटांची किंमत रद्दीच्या भावात गेली. मात्र या सगळ्याला छेद दिलाय १०००-५०० सारख्या हुबेहुबे दिसणाऱ्या या पॉकेटनं. खऱ्या नोटांचा भाव जरी कमी झाला तरी या पॉकेटला नागरिकांनी चांगलीच पसंती दिलीय. बाजारात या पॉकेटची चांगलीत क्रेझ आहे. आणि ग्राहकही त्याला पंसती देत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. एकंदरीतच काय खऱ्या १०००-५०० च्या नोटा जरी चलनातून बाद झाल्या तरी खेळण्यातल्या नोटांची क्रेझ कायम राहणार हे मात्र नक्की.

 

Loading Comments