दीनानाथ मंगेशकर यांच्या 75 व्या स्मृतिदिन सोहळ्यास अामिरची उपस्थिती

 Matunga
दीनानाथ मंगेशकर यांच्या 75 व्या स्मृतिदिन सोहळ्यास अामिरची उपस्थिती

दीनानाथ मंगेशकर यांचा 75 वा स्मृतिदिन सोहळा सोमवारी 24 एप्रिलला षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान हृदयेश आर्ट्सच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. यावेळी दीनानाथ पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे.

विशेष बाब म्हणजे यामध्ये अनेक कलाकार आणि कलावंतांचा गौरव देखील करण्यात येणार आहे. यावेळी अामिर खान याला देखील गौरवण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना स्वरांची मानवंदना देण्यासाठी 'मर्मबंधातील ठेव' या संगीत कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कौशिकी चक्रवर्ती, महेश काळे, राहुल देशपांडे या दिग्गज कलाकारांची सुरेल मैफिलही रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली श्रीखंडे या करणार आहेत. सदर कार्यक्रमाचा प्रवेश विनामूल्य असून षण्मुखानंद, दीनानाथ नाट्यगृह, महाराष्ट्र वॉच कं, दादर येथे विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध आहे.

Loading Comments